Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault च्या ‘या’ 2 Cars ची जादू कायम! मार्च 2026 च्या विक्रीत 77 टक्क्यांची विक्रमी वाढ, विकल्या हजारो गाड्या

रेनॉल्टच्या वाहनांना नेहमीच भारतात चांगली मागणी मिळत आली आहे. नुकतेच ,मार्च 2026 मध्ये कंपनीच्या वाहनांना ग्राहकांनी भरभरून खरेदी केले आहे. ज्यामुळे मागील महिन्यात कंपनीच्या विक्रीत 77 टक्क्यांची विक्रमी वाढ निर्माण झाली

  • By मयुर नवले
Updated On: Apr 02, 2026 | 07:23 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • रेनॉल्टच्या वाहनांना चांगली मागणी
  • Kiger आणि Triber या दोन्ही कार्सच्या विक्रीत वाढ
  • जाणून घ्या कंपनीचा सेल्स रिपोर्ट
Renault India ने भारतीय बाजारात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत मार्च 2026 मध्ये वर्षभराच्या तुलनेत तब्बल 77 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे. कंपनीने मार्च महिन्यात 5,046 युनिट्सची घाऊक विक्री केली असून, मागील वर्षी याच कालावधीत 2,846 युनिट्सची विक्री झाली होती.

कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्येही सातत्यपूर्ण वाढ कायम राखली आहे. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रेनॉ इंडियाने एकूण 42,018 युनिट्सची विक्री केली असून, FY25 मधील 37,900 युनिट्सच्या तुलनेत 11 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या वाढीमुळे कंपनीची भारतीय बाजारातील पकड अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते.

VinFast भारतात आपली मुळे घट्ट करण्यासाठी सज्ज! नवीन E Scooter लाँच करण्याच्या तयारीत

नवीन Renault Kiger आणि Renault Triber या मॉडेल्सनी विक्रीत मोठा वाटा उचलला आहे. मार्च महिन्यातील एकूण विक्रीपैकी तब्बल 63 टक्के हिस्सा या दोन्ही गाड्यांचा होता. ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या मॉडेल्सनी बाजारात आपली मजबूत उपस्थिती कायम ठेवली आहे.

कंपनीने Q2 मध्ये या दोन्ही मॉडेल्सचे अपडेटेड व्हर्जन सादर केल्यानंतर आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत एकूण 27 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यावरून रेनॉच्या नव्या प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीला आणि प्रीमियम व्हॅल्यू ऑफरिंगला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात रेनॉच्या बहुप्रतीक्षित Renault Duster या आयकॉनिक SUV च्या डिलिव्हरीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

रेनॉ ही युरोपमधील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, ‘Renaulution’ या धोरणात्मक योजनेअंतर्गत कंपनी अधिक स्पर्धात्मक, संतुलित आणि इलेक्ट्रिफाइड वाहनांची श्रेणी सादर करण्यावर भर देत आहे.

भारतामध्ये रेनॉची उत्पादन सुविधा चेन्नईतील ओरगडम येथे असून, येथे दरवर्षी 4.8 लाख युनिट्स उत्पादनाची क्षमता आहे. देशभरात कंपनीचे 350 हून अधिक विक्री केंद्रे आणि 450 पेक्षा अधिक सर्व्हिस टचपॉइंट्स आहेत. याशिवाय 250 हून अधिक ‘वर्कशॉप ऑन व्हील्स’ सुविधेद्वारे कंपनी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आहे.

Web Title: Renault march 2026 sales increased by 77 pecent huge contribution of kiger triber

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • automobile
  • record sales
  • Renault

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.