फोटो सौजन्य: Social Media
भारतात पहिल्यापासूनच रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची मोठी क्रेज पाहायला मिळते. भारतीय बाजारपेठेत रेट्रो लुक आणि शक्तिशाली इंजिन असलेल्या अनेक बाइक्स रॉयल एन्फिल्ड लाँच करत असते ज्याची भूतान अनेक तरुणांना पडते. आज प्रत्येक तरुणाला आपली पहिली बाईक बुलेटच असावी असे वाटत असते. ग्राहकांची हीच मागणी पाहता कंपनी सुद्धा नवनवीन आणि अपडेटेड बाईक्स लाँच करत असते. या बाईक्सचा एक वेगळाच थाट तर असतोच पण त्या परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा खूप दादमदार असतात.
लवकरच कंपनी एक नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, हंटर 350 चे अपडेटेड व्हर्जन कंपनी लाँच करू शकता. चला जाणून घेऊया, कंपनी या नवीन बाईकमध्ये कोणते बदल करू शकते आणि ही कधी लाँच केली जाऊ शकते.
रॉयल एनफिल्डने हंटर 350 ही सर्वात स्वस्त बाईक म्हणून विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. कंपनीची ही बाईक बाजारात खूप पसंत केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या बाईकचे अपडेटेड व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लाँचच्या अगोदर, अपडेटेड हंटर 350 टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. कंपनी या बाईकमध्ये चांगले आणि नवीन रियर सस्पेन्शन देऊ शकते. याशिवाय यामध्ये एलईडी राउंड हेडलाईट देण्यात येणार आहे.
Royal Enfield Hunter 350 च्या अपडेटेड व्हर्जनच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची फार कमी आशा आहे. सध्याच्या बाईकसारखेच इंजिन यात दिले जाऊ शकते. बाइकमध्ये 349 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ज्यामुळे याला 20.2 BHP पॉवर आणि 27 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. नवीन हंटर 350 मध्येही हेच इंजिन वापरण्यात येणार आहे.
याच्या लाँचबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण ही बाईक जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटीमध्ये सादर केली जाईल अशी अपेक्षा आहे. यानंतर, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही बाईक अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत लाँच केली जाऊ शकते.
हे देखील वाचा: कारची Extended Warranty किती असते फायदेशीर? खरंच यात सगळे पार्ट्स कव्हर होतात?
हंटर 350 ही रॉयल एनफिल्डने ऑफर केलेली सर्वात हलकी बाइक आहे, ज्याचे वजन फक्त 181 किलो आहे. याशिवाय, त्यात बसवलेल्या इंजिनमुळे ते खूप चांगले कार्य करते. त्यामुळे भारतात याला खूप पसंती दिली जाते.