फोटो सौजन्य: iStock
दिवाळीचा सण सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी उरला आहे. दिवाळी हा भारतीयांचा आवडीचा सण आहे. या काळात अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. तर कित्येक जण आपली ड्रीम कार विकत घेत असतात.
अनेक ऑटो कंपनीज सुद्धा या काळात नवीन कार्स लाँच करत असतात. तसेच आपल्या अनेक कार्सवर स्पेशल डिस्काउंट ऑफर्स सुद्धा देत असतात. त्यामुळे ग्राहक या शुभ काळात नवीन कार घेताना दिसतात. पण अनेक वेळा कार घेताना शोरूममधील व्यक्ती आपल्याला एक्सटेंडेड वॉरंटी घेण्यास प्रवृत्त करते आणि कित्येकवेळा आपण ती घेतो सुद्धा. या सेवेसाठी आपल्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागते. पण एक्सटेंडेड वॉरंटी घेणे खरंच फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया.
सहसा, कोणतेही नवीन वाहन खरेदी करताना, कंपनीकडून वॉरंटी दिली जाते. ही वॉरंटी काही अटींसह ऑफर केले जाते आणि त्याचा कालावधी दोन ते तीन वर्षे किंवा काही किलोमीटरपर्यंत असतो. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कारसाठी दीर्घ कालावधीसाठी अशी सुविधा हवी असेल, तर कंपनीकडून त्याला काही शुल्कासह एक्सटेंडेड वॉरंटी दिली जाते.
हे देखील वाचा: भारतातील क्लासिक व्हिंटेज कार्स; आजही तरुणांच्या मनाला वेड लावतात
तुम्ही तुमच्या कारची एक्सटेंडेड वॉरंटी विकत घेतल्यास, त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. ज्यामध्ये कोणताही भाग खराब झाल्यास त्याला दुरुस्ती करणे किंवा बदलणे समाविष्ट आहे. त्यासोबत मजुरीचा खर्च आणि इतर खर्चाचाही त्यात समावेश आहे. यामुळे अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या अतिरिक्त खर्चापासून ग्राहक सुरक्षित राहतो.
जर तुम्हीही दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कारची डिलिव्हरी घेणार असाल, तर त्यापूर्वी एक्सटेंडेड वॉरंटीबद्दल संपूर्ण माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कारमध्ये असे अनेक पार्टस असतात ज्यांचा या वॉरंटीमध्ये समावेश होत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नंतर त्या पार्ट्ससाठी वॉरंटी मागितली, तर कंपनी सरळ नकार देऊ शकते. म्हणूनच, एक्सटेंडेड वॉरंटीसाठी अतिरिक्त पैसे देण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा: आता Alto सारख्या लहान कारनाही बनवता येते बुलेटप्रुफ; जाणून घ्या नेमका किती येतो खर्च?
एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये कारचा काही पार्ट्स जसे की टायर, बॅटरी यात समाविष्ट नसतात. याशिवाय आपली चूक, गैरवापर किंवा अपघात झाल्यासही एक्सटेंडेड वॉरंटीचा लाभ घेऊ शकत नाही. काही कंपनीज वॉरंटी बेनिफिट देखील रद्द करतात जेव्हा एखादी व्यक्ती त्याची कार मार्केटमध्ये मॉडिफाय करतो.