फोटो सौजन्य; Social Media
भारतात काळानुसार कार खरेदीदारांच्या अपेक्षा सुद्धा बदलत आहे. अशावेळी ऑटो कंपनीज अनेक नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असतात. कित्येक कंपनीज सध्याच्या मॉडेलमध्येच अत्याधुनिक फीचर्स समाविष्ट करतात आणि त्याचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करत असतात.
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे जी तिच्या उत्तम कार्ससाठी ओळखली जाते. सध्या कंपनी नवीन कॉम्पॅक्ट सेडान कार लाँच करण्याची तयारी करत आहे. चला जाणून घेऊया, दिवाळी 2024 नंतर ही कार कंपनी कोणत्या तारखेला लाँच केली जाईल.
मारुती कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये देऊ केलेल्या मारुती डिझायरची नवीन जनरेशन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे ही अपडेटेड कार आपल्या सेगमेंटमधील सर्व कार्सना जबरदस्त टक्कर देणार आहे.
हे देखील वाचा: कारची Extended Warranty किती असते फायदेशीर? खरंच यात सगळे पार्ट्स कव्हर होतात?
कंपनीकडून अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, मारुती डिझायर न्यू जनरेशन 11 नोव्हेंबर 2024 ला लाँच होईल.
नवीन जनरेशनच्या मारुती डिझायरमध्ये कंपनीकडून अनेक मोठे बदल केले जाणार आहेत. याशिवाय यात अनेक उत्तमोत्तम फीचर्सही देण्यात येणार आहेत. पुढील बंपर, हेडलाइट्स, मागील बंपर आणि कारच्या लाइट्ससोबतच फॉग लाइट्सनाही नवीन डिझाइन देण्यात येणार आहे. याशिवाय इंटिरिअरमध्येही चांगले बदल करण्यात येणार आहेत. फीचर्स म्हणून, नवीन जनरेशन डिझायरला सिंगल पेन सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट आणि अधिक चांगली इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल.
हे देखील वाचा: आता Alto सारख्या लहान कारनाही बनवता येते बुलेटप्रुफ; जाणून घ्या नेमका किती येतो खर्च?
Dezire ची नवीन जनरेशन नवीन इंजिनसह येणार आहे. यामध्ये मारुती स्विफ्ट 2024 मध्ये Z सीरीजचे Z12E इंजिन दिले जाईल. यामुळे सेडान कारला 111.7 न्यूटन मीटरच्या टॉर्कसह 60 KW ची शक्ती मिळेल. यात पाच स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन दिले जाईल. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील लाँच केले जाण्याची दाट शक्यता आहे.
सध्याच्या पिढीतील Dezire ची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.34 लाख रुपये आहे. त्याच किंमतीत नवीन जनरेशन मारुती डिझायर देखील कंपनी आणू शकते.