खास Batman Lovers साठी STUDDS ने लाँच केला स्टायलिश हेल्मेट, किंमत फक्त...
भारतात दुचाकी चालवताना हेल्मेट किती महत्वाचे आहे हे आपण सर्वच जाणतो. मात्र, कित्येक जणांना जसे आपली बाईक इतर बाईकपेक्षा उठून दिसावी असे वाटत असते. तसेच आपले हेल्मेट देखील थोडे हटके असावे अशी भावना सुद्धा अनेक जणांची असते. त्यामुळेच हल्ली काही हेल्मट उत्पादक कंपन्या बाजारात सुरक्षितता प्रदान करणारे स्टायलिश हेल्मेट ऑफर करत असतात.
आजच्या काळात, हेल्मेट केवळ सुरक्षिततेसाठी नाहीत तर ते पर्सनालिटीचा एक भाग देखील बनले आहे. हा विचार लक्षात घेऊनच, STUDDS ने वॉर्नर ब्रदर्स डीसीच्या सहकार्याने भारतीय बाजारात बॅटमॅन एडिशन ड्रिफ्टर हेल्मेट लाँच केले आहे. ते ISI आणि DOT दोन्ही सुरक्षा प्रमाणपत्रांसह लाँच केले गेले आहे.
Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
या बॅटमॅन एडिशन हेल्मेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उत्तम डिझाइन आणि मजबूत सेफ्टी फीचर्स. त्याच्या डिझाइनमध्ये बॅटमॅन-प्रेरित ग्राफिक्स आहेत, जे राईडला एक वेगळी स्टाइल देतात. हे हेल्मेट केवळ शहरी वाहतुकीतच नव्हे तर महामार्गावर देखील एरोडायनामिक स्टेबिलटी प्रदान करते. STUDDS म्हणते की हे लाँच त्यांच्या मोठ्या योजनेची सुरुवात आहे, ज्यामध्ये येत्या काळात DC सुपरहिरोंनी प्रेरित अनेक हाय-परफॉर्मन्स असलेले हेल्मेट लाँच केले जातील.
STUDDS च्या या नवीन हेल्मेटमध्ये उच्च-प्रभाव आऊटर शेल, रेग्युलेटड डेन्सिटी EPS, डायनॅमिक व्हेंटिलेशन सिस्टम, ड्युअल व्हिझर सिस्टम, क्विक-रिलीज चिन स्ट्रॅप, रस्ट -प्रूफ स्टेनलेस स्टील बकल आणि वॉशेबल लाइनर्स आहेत.
नुसता लुटालूट ! भारतात Audi Q7 ची किंमत कोटी रुपयात अन् जर्मनीत लाख रुपयात
हे हेल्मेट Black – Blue, Yellow – Grey, Red – Grey, Gold – Grey, Green – Grey, आणि Silver – Grey रंगाच्या पर्यायांमध्ये आणले गेले आहे. यापैकी तीन रंग व्हेरिएंट मेटॅलिक फॉइल फिनिशसह येतात जे क्रोम एलिमेंट्सद्वारे एक उत्तम लूक देतात. या हेल्मेटमधील यूव्ही-प्रतिरोधक पेंट दीर्घकाळ त्याची चमक टिकवून ठेवतो.
STUDDS च्या फुल-फेस Batman Edition Drifter हेल्मेटची सुरुवातीची किंमत 2,995 रुपये आहे. प्रत्येक रायडरला योग्य फिटिंग मिळावी म्हणून ते मध्यम, मोठे आणि अतिरिक्त मोठे आकारात आणले गेले आहे. तुम्ही ते STUDDS च्या वेबसाइट, रिटेल स्टोअर्स आणि एक्सक्लुझिव्ह आउटलेटमधून खरेदी करू शकता.