फोटो सौजन्य: @suzuki2wheelers/ X.com
जगभरात तर Anime पहिले जातेच मात्र मागील काही वर्षांपासून भारतात देखील Anime पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यातही त्यांचे आवडते ॲनिमे म्हणजे Naruto. जर तुम्ही देखील Naruto फॅन असाल तर मग तुम्हाला नवीन Suzuki Avenis नक्कीच आवडेल.
सुझुकी मोटरसायकलने त्यांची लोकप्रिय स्पोर्टी स्कूटर सुझुकी एवेनिस एका नवीन अंदाजात सादर केली आहे. कंपनीने अॅनिमे मालिकेतील नारुतो शिपुडेनसोबत एक विशेष पार्टनरशिप केली आहे. केवळ जपानमध्येच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेला हा अॅनिमे आता भारतातील तरुणांना सुझुकीच्या नवीन थीमशी जोडणार आहे. हा खास स्कूटर फक्त 94 000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आला आहे. Avenis ची स्पेशल एडिशन कोणत्या खास फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
GST कमी झाल्यानंतर Force Motors चे ‘हे’ मॉडेल झाले स्वस्त, किती असेल किंमत?
नारुतोचा कधीही हार न मानणारा ॲटिट्यूड भारतीय तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सुजुकीचे मत आहे की या ॲनिमेचा जोश आणि Avenis चा स्पोर्टी कॅरेक्टर यांचा कॉम्बिनेशन तरुणांशी अधिक प्रभावीपणे जोडला जाईल. या थीमद्वारे कंपनी पॉप कल्चर आणि ट्रान्सपोर्टेशन यांना एकत्र आणत आहे.
Suzuki Avenis मध्ये 124.3 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. त्यात सुझुकी इको परफॉर्मन्स तंत्रज्ञान आहे. त्यात एलईडी लाइटिंग, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे. त्याची डिझाइन शार्प आणि आक्रमक दिसते. यासोबतच, त्यात फ्रंट बॉक्स + यूएसबी चार्जिंग पोर्ट, बाह्य इंधन कॅप, 21.8 लिटर अंडर-सीट स्टोरेज, टेलिस्कोपिक सस्पेंशन, सीबीएस (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम) आणि 12-इंच टायर आणि साइड स्टँड आहे.
Hyundai Creta Electric चा ‘हा’ व्हेरिएंट क्षणार्धात होईल तुमचा, फक्त इतकाच असेल EMI?
तीन व्हर्जन्समध्ये Avenis उपलब्ध आहे, जे स्टँडर्ड एडिशन, राइड कनेक्ट एडिशन आणि स्पेशल एडिशन (नारुतो थीम) आहेत. हे मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्व्हर नंबर 2 / ग्लास स्पार्कल ब्लॅक, ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक / पर्ल ग्लेशियर व्हाइट, ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक / पर्ल मीरा रेड आणि ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे. त्याची स्पेशल एडिशन नारुतो थीम एका अनोख्या काळ्या आणि चांदीच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये येते.