फोटो सौजन्य: @foroelectricos/X.com
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. ग्लोबल लेव्हलवर ज्यांच्या कार लोकप्रिय आहेत अशा Suzuki कंपनीने सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करायला सुरुवात केली आहे.
29 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये जपान मोबिलिटी शो 2025 सुरू होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सुझुकी त्यांची नवीन Vision e-Sky इलेक्ट्रिक कारचे अनावरण करणार आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
व्हिजन ई-स्कायचे डिझाइन सुझुकीच्या लोकप्रिय वॅगनआरपासून प्रेरित आहे, परंतु तिला आधुनिक आणि फ्यूचरिस्टिक लूक देण्यासाठी त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. यात पिक्सेल-स्टाइल लाइटिंग एलिमेंट आणि सी-आकाराचे एलईडी डीआरएल असलेले नवीन फ्रंट फॅसिया आहे. ग्रिल पूर्णपणे बंद आहे, ज्यामुळे ती एक स्पष्ट इलेक्ट्रिक लूक देते. बंपर सेक्शन सपाट आहे, ज्यामुळे कारला आणखी आकर्षक लूक मिळतो.
नवीन GST Rates पावले रे बाबा! TVS Jupiter 125 च्या किमतीत मोठी घट, किंमत आता फक्त…
या कारच्या साइड प्रोफाइलमध्ये उठावदार व्हील आर्चेस, रिट्रॅक्टेबल डोअर हँडल्स आणि ब्लॅक-आउट केलेले A आणि B पिलर्स देण्यात आले आहेत. याशिवाय Vision e-Sky मध्ये किंचित टेपरिंग असलेली रूफलाइन दिली असून त्यामुळे ती पेट्रोल WagonR च्या तुलनेत अधिक स्पोर्टी दिसते.
या कारच्या मागील बाजूस C-आकाराच्या टेललाइट्स, रुंद रियर विंडस्क्रीन आणि स्पॉइलरवर बसवलेले स्टॉप लॅम्प्स दिले आहेत. तिची लांबी 3,395 मिमी, रुंदी 1,475 मिमी आणि उंची 1,625 मिमी आहे. हे माप जवळपास जपानमध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोल WagonR सारखेच आहेत.
या इलेक्ट्रिक कारचे इंटिरिअर आधुनिक आहे, जे पारंपारिक जपानी सौंदर्यशास्त्राचे प्रतिबिंब आहे. डिजिटल स्क्रीन आणि सेंट्रल कन्सोलमध्ये मिरर-थीम असलेली डिझाइन आहे. यात दोन मोठे 12-इंच डिस्प्ले असू शकतात, एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि दुसरे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी.
Elon Musk च्या Tesla Model Y चा नवा व्हेरिएंट सादर, भारतात लाँच होणार का?
सुझुकीने अद्याप व्हिजन ई-स्काय कॉन्सेप्टचे टेक्निकल फीचर्स शेअर केलेले नाहीत. मात्र, कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक कार 270 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची रेंज देईल. हे मॉडेल भारतात लाँच केले जाणार नाही, परंतु मारुती भविष्यात भारतासाठी एक नवीन सब-4 मीटर इलेक्ट्रिक कार सादर करू शकते.