फोटो सौजन्य: @volklub/X.com
भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ने जाहीर केले की त्यांच्या ऑल-न्यू अल्ट्रोजला भारत एनसीएपी (BNCAP) कडून प्रतिष्ठित 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. प्रौढ प्रवासी संरक्षणामध्ये 29.65/32 आणि बाल संरक्षणामध्ये 44.9/49 असा प्रभावी स्कोअर नोंदवत अल्ट्रोज आता अधिकृतपणे भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक ठरली आहे. विशेष म्हणजे, 2020 मध्ये ग्लोबल एनसीएपीकडून 5-स्टार रेटिंग मिळवणारी अल्ट्रोज ही पहिली हॅचबॅक होती, आणि आता देशांतर्गत प्रोटोकॉल अंतर्गत पुन्हा एकदा सुरक्षिततेचे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत.
अल्ट्रोजची एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ती भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे जी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तीनही पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध आहे. या सर्व व्हेरिएंट्ससाठी 5-स्टार रेटिंग मिळवणारी ही भारतातील पहिली कार बनली असून, सीएनजी-सपोर्टेड कार्समध्ये हा मान मिळवणारी एकमेव मॉडेल ठरली आहे. यामुळे अल्ट्रोजच्या सर्व इंधन व्हेरिएंट्समध्ये सुरक्षितता आणि वैविध्यतेतील तिचे अग्रस्थान अधोरेखित झाले आहे.
GST कमी झाल्याने ‘ही’ एसयूव्ही झाली एकदमच स्वस्त, किंमत 1.55 लाख रुपयांनी झाली कमी
या उल्लेखनीय यशाबद्दल टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि.चे उपाध्यक्ष व मुख्य उत्पादन अधिकारी मोहन सावरकर म्हणाले, “अल्ट्रोजने प्रीमियम हॅचबॅक श्रेणीत नेहमीच आघाडी घेतली आहे. आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि मल्टी-पॉवरट्रेन पर्याय यांच्या साहाय्याने ही कार ग्राहकांना विशेष अनुभव देते. भारत एनसीएपीकडून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन्ससाठी 5-स्टार रेटिंग मिळवणारी ही पहिलीच कार ठरली आहे. या यशातून सुरक्षित व विश्वासार्ह कार पुरवण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे दर्शन घडते, ज्यावर आमचे ग्राहक आत्मविश्वासाने विसंबू शकतात.
मे 2025 मध्ये लाँच झालेली ऑल-न्यू अल्ट्रोज टाटा मोटर्सच्या ALFA (Agile Light Flexible Advanced) आर्किटेक्चरवर आधारित असून तिचे डायमंड स्ट्रेंथ सेफ्टी शील्ड प्रवाशांना जास्तीत जास्त संरचनात्मक प्रबळता व सुधारित क्रम्पल झोन्स प्रदान करते.
6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, 360° एचडी सराउंड व्ह्यू कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, डायरेक्ट TPMS, SOS व ब्रेकडाऊन असिस्टन्स, रेन-सेंसिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प्स आणि कॉर्नरिंग फंक्शनसह LED फॉग लॅम्प्स यांसारखी प्रगत सेफ्टी फीचर्स प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित करतात.
सुरक्षिततेव्यतिरिक्त, अल्ट्रोजमध्ये प्रीमियम डिजिटल अनुभव देखील मिळतो. हार्मनची 10.25 इंचाची अल्ट्रा-व्यू इन्फोटेनमेंट सिस्टीम फुल-डिजिटल एचडी क्लस्टरसह समाकलित करण्यात आली आहे. व्हॉईस-एनेबल सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व ॲपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग, ड्युअल 65-वॅट फास्ट चार्जर्स, एअर प्यूरीफायरसह त्वरित कूलिंग आणि iRA कनेक्टेड कार तंत्रज्ञान यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक आधुनिक व सोयीस्कर झाला आहे. सॉफ्ट-टच मटेरियल्स, ॲम्बियंट लाईटिंग आणि लाऊंजसारखी रियर सीटिंग केबिनला लक्झरीचा टच देतात.
कार्यक्षमतेबाबतही अल्ट्रोज आपल्या सेगमेंटमध्ये अग्रस्थानी आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स, DCA आणि AMT या ट्रान्समिशन पर्यायांसह पेट्रोल, डिझेल आणि CNG पॉवरट्रेन्समध्ये ही कार उपलब्ध आहे. ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञानासह मिळणारी अल्ट्रोज ही भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण व प्रीमियम निवड ठरली आहे.