पुन्हा एकदा विक्रीत मारली बाजी, आता तर GST 2.0 मुळे अजूनच झाली स्वस्त
भारतात एसयूव्ही विभागात चांगल्याच परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या जातात. यातही अनेकांची पहिली पसंत म्हणजे Toyota Fortuner. ही एसयूव्ही सेलिब्रेटी, नेते मंडळी आणि उद्योगपतींच्या कार कलेक्शन पाहायला मिळतेच. तसेच, सामन्यांमध्ये सुद्धा या कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसते. नुकतेच या एसयूव्हीने ऑगस्ट 2025 च्या महिन्यात बाजी मारली आहे.
टोयोटा फॉर्च्युनरला भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच मागणी असते. हे पुन्हा एकदा सिद्ध करून, टोयोटा फॉर्च्युनरने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये फुल साइझ एसयूव्ही सेगमेंटच्या विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे. या काळात टोयोटा फॉर्च्युनरने एकूण 2,508 एसयूव्ही विकल्या, ज्यात वार्षिक 7 टक्के वाढ झाली. तर अगदी एक वर्षापूर्वी, म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये हा आकडा 2,338 युनिट्स होता. गेल्या महिन्यात या सेगमेंटमधील इतर मॉडेल्सच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
विक्रीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्कोडा कोडियाक होती. मात्र, या काळात स्कोडा कोडियाकच्या विक्रीत वार्षिक आधारावर तब्बल 48 टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट 2025 मध्ये या मॉडेलचे केवळ 75 युनिट्स विकले गेले, तर नेमके एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये हा आकडा 145 युनिट्स इतका होता.
Safest Cars: काहीही झालं तरी जीव सुरक्षित राहणार! ‘या’ आहेत देशातील सर्वात सुरक्षित कार
याशिवाय, विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर जीप मेरिडियन होती. जीप मेरिडियनने या काळात 25 टक्के वार्षिक वाढ नोंदवत एकूण 75 युनिट्स SUVची विक्री केली. तर ऑगस्ट 2024 मध्ये तिची विक्री फक्त 60 युनिट्स होती.
दुसरीकडे, विक्रीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर एमजी ग्लॉस्टर होती. मात्र, या कालावधीत याच्या विक्रीत वार्षिक आधारावर तब्बल 93 टक्क्यांची घसरण झाली. ऑगस्ट 2025 मध्ये एमजी ग्लॉस्टरला केवळ 16 नवीन ग्राहक मिळाले, तर नेमके एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये हा आकडा 236 युनिट्स होता.
Triumph ची 350cc बाईक होऊ शकते लाँच, GST 2.0 नंतर किंमत होणार कमी?
याशिवाय, पाचव्या क्रमांकावर Volkswagen Tiguan राहिली. टिगुआनच्या विक्रीत वार्षिक आधारावर 89 टक्के घट झाली असून, ऑगस्ट 2025 मध्ये फक्त 8 युनिट्स SUVची विक्री झाली.