फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाइल मार्केट टाटा मोटर्स शिवाय अपुरे आहे. टाटा मोटर्स ही एक अशी ऑटो कंपनी आहे जिच्या कार्सवर आजही ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत असतात. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनाचा असल्यामुळे, सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनाकडे सुद्धा लक्षकेंद्रित करत आहेत. यासोबत ग्राहकांना अत्याधुनिक फीचर्ससह सेफ्टी फीचर्स सुद्धा देण्याकडे कंपनी लक्ष देत आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्स आपल्या वाहनांवर विशेष ऑफर्स सुद्धा देत असतात. जेणेकरून जास्तीतजास्त ग्राहकांनी कंपनीच्या कार्स खरेदी कराव्या. आता कंपनी जून महिन्यात लाँच झालेल्या कारवर पहिल्यांदाच बंपर डिस्कॉउंट्स देत आहे.
Maruti Dzire 2024 खरेदी करावी की नवीन Amaze येण्याची वाट पाहावी? नेमके करावे काय जाणून घ्या
Altroz Racer ही बजेट-फ्रेंडली आणि चांगली कार आहे. टाटा कंपनीने पहिल्यांदाच या कारवर डिस्काउंट ऑफर आणली आहे. Tata Altroz Racer भारतीय बाजारात या वर्षी 7 जून रोजी 2024 मध्ये लाँच करण्यात आली होती. आता पाच महिन्यांनंतर या कारवार ऑफर आली आहे. भारतीय बाजारात ही कार तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Tata Altroz Racer ची एक्स-शोरूम किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.99 लाख रुपयांपर्यंत जाते.
Tata Altroz Racer वर 65 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे, ज्यामध्ये कॅश डिस्काउंट तसेच एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. ही कार R1, R2 आणि R3 या तीन व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्याच्या टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे. यासोबतच या वाहनात 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि पॉवर्ड सनरूफ आहे.
टाटा अल्ट्रोझ रेसरमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. या कारमध्ये बसवलेले इंजिन 120 hp ची पॉवर प्रदान करते. त्याचे स्टॅंडर्ड मॉडेल 6-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससह सुसज्ज आहे. टाटा या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ड्युअल-क्लच युनिट आणण्याचा विचार करत आहे. ऑटोमेकर्स आगामी काळात या कारचे इलेक्ट्रिक मॉडेलही बाजारात आणू शकतात.
Hyundai i20 N लाइन थेट टाटा अल्ट्रोझ रेसरशी स्पर्धा करते. या Hyundai कारमध्ये 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. या वाहनात मॅन्युअल आणि ड्युअल-क्लच ऑटो गिअर बॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. Hyundai i20 N Line च्या मॅन्युअल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.42 लाख रुपयांपर्यंत जाते. तर ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.15 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.52 लाख रुपयांपर्यंत जाते.