फोटो सौजन्य: istock
भारतात दिवसेंदिवस कार्स व बाईक्सची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हल्ली इलेक्ट्रिक कार्सला सुद्धा जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. पण इलेक्ट्रिक आणि पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या कार्सची तुलना केली तर समजेल की आजही देशात इंधनावर चालणाऱ्या कार्स आणि बाईक्स जास्त वापरल्या जातात. यामुळे भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे वायू प्रदूषणाचा प्रश्न.
वाय प्रदूषण ही आपल्या देशासाठी एक मोठी समस्या बनली आहे. एरवी मोकळ्या हवेत श्वास घेणाऱ्यांना आता मास्क घालावा लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्ली. राजधानी दिल्लीत नेहमीच वायू प्रदूषणाचा पारा वाढताना दिसतो. अशावेळी केंद्र सरकार सुद्धा देशातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करताना दिसत आहे.
दिल्ली एनसीआरसह भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. AQI ने धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी काही महत्वाची पाऊले केंद्र सरकारकडून उचलली गेली आहे. त्यातीलच एक पॉल म्हणजे भारत स्टेज. हे काय आहे आणि ते कधी सुरू झाले? ते प्रदूषण कमी करण्यास कसे मदत करते? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.
देशातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच मानके निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने भारत स्टेज सुरू केले आहे. हे उत्सर्जन मानक आहे. त्यांच्या अंमलबजावणीची कालमर्यादा केंद्रीय पर्यावरण, वने तसेच हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निश्चित केली जाते.
हे भारतात 2000 मध्ये सुरू झाली. भारत स्टेज -1 आणि 2, 2000 ते 2010 दरम्यान देशभरात राबविण्यात आला. यानंतर 2010 मध्ये बीएस-3 सादर करण्यात आला. 1 एप्रिल 2017 पासून देशात बीएस-4 लागू करण्यात आला. BS-6 चा पहिला टप्पा 1 एप्रिल 2020 पासून देशात लागू करण्यात आला आणि BS-6 चा दुसरा टप्पा 1 एप्रिल 2023 पासून देशभर लागू करण्यात आला. विशेष म्हणजे सरकारने बीएस-5 मानके आणली नाहीत आणि बीएस-4 नंतर बीएस-6 थेट लागू करण्यात आले.
जेव्हा नवीन भारत स्टेज मानके देशात लागू केली जे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. नवीन मानकांच्या अंमलबजावणीसह, ऑटोमेकर्सना त्यांची वाहने अपडेट करावी लागतील, ज्यामध्ये मुख्यतः इंजिनमधील बदलांचा समावेश आहे. याशिवाय देशात तेल पुरवठा करणाऱ्या कंपनीजनी आपल्या इंधनाचा दर्जा सुधारावा. त्यानंतर अपडेटेड तंत्रज्ञानासह इंजिनमध्ये चांगले इंधन वापरले जाते आणि यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.