फोटो सौजन्य: Social Media
देश आणि विदेशातील कित्येक ऑटो कंपन्या भारतात आयोजित झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये आपल्या शानदार कार सादर करत आहे. विविध सेगमेंटमधील कार आता पर्यंत सादर झाल्या आहेत. पण आता एका वेगळ्याच कारची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. या कारच्या लूकचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊया.
अखेर Tata Avinya चा लूक समोर आला आहे. या कारचा लूक पाहिल्यावर तुम्ही नुकतेच लाँच झालेल्या महिंद्रा BE 6 आणि XEV 9e ला विसरून जाल. एवढेच काय, मर्सडिज बेंझच्या कार सुद्धा या कारसमोर फिक्या पडतील.
टाटा मोटर्सने अखेर ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची पूर्ण-इलेक्ट्रिक कंसेप्ट कार Avinya चे अनावरण केले. 2025 साठी Avinya ही नवीन इंटिरिअर आणि एक्सटिरिअर डिझाइनसह एसयूव्ही कंसेप्ट म्हणून सादर केली गेली आहे. ही एक इलेक्ट्रिक क्रॉसओवर आहे जी पूर्णपणे नवीन JLR शेअर्ड EMA (इलेक्ट्रिक मॉड्यूलर आर्किटेक्चर) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
खूप झाली CNG बाईकची हवा ; आता मार्केटमध्ये CNG Scooter मारणार एंट्री, Auto Expo 2025 मध्ये दिसली झलक
या एसयूव्हीची रचना समोरून फ्लॅट आहे. तसेच यात उंचावलेल्या बोनेटसह एक मजबूत डिझाइन आहे. मोठ्या ब्लँक-ऑफ ग्रिलमध्ये अविन्या सिग्नेचर आहे आणि त्यात रडार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स आहेत. हेडलॅम्प युनिट हॅरियर आणि सफारीमध्ये दिसणाऱ्या युनिटसारखेच आहे. परंतु, त्यात मॅट्रिक्स एलईडी तंत्रज्ञान असण्याची अपेक्षा आहे. त्यात टी-आकाराचे एलईडी डीआरएल, ब्लँक-ऑफ ग्रिल आणि आकर्षक एलईडी हेडलाइट्स असणार आहेत.
या कारला अधिक मस्क्युलर बॉडी डिझाइन देण्यात आली आहे. कॅमेरा-आधारित बाह्य रीअरव्ह्यू मिरर (ORVM) आणि समोरच्या दारावरील ‘अविन्या’ बॅज देखील कायम ठेवण्यात आला आहे. टेललाईट्समध्ये देखील एलईडी डीआरएल प्रमाणे टी-आकाराचे डिझाइन आहे.
एसयूव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल १२.३-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि मल्टी-झोन ऑटो एसी सारख्या फीचर्सचा समावेश असेल. त्याचबरोबर यामध्ये सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली आहे.
Yamaha कडून भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ‘या’ बाईक्सचे दमदार प्रदर्शन
टाटा मोटर्स प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे नेहमीच लक्ष देताना दिसत आहे. कंपनीच्या काही कारला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. Tata Avinya मध्ये सुद्धा उत्तम सेफ्टी फीचर्स पाहायला मिळणार आहे.
सुरक्षिततेसाठी टाटा अविन्या एसयूव्हीमध्ये मानक म्हणून 6 एअरबॅग्ज असतील. याशिवाय, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ADAS सारखे अनेक प्रगत सेफ्टी फीचर्स त्यात प्रदान केले जातील. टाटा अविन्याच्या पॉवरट्रेनबद्दल फारशी माहिती नाही पण ती FWD, RWD आणि AWD क्षमतांसह 600 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते.