Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किंमत… स्मार्ट फीचर्स! Tata Harrier आणि Safari अ‍ॅडव्‍हेंचर X व्हेरिएंट लाँच, काय आहे किंमत?

टाटा मोटर्सने आज त्यांच्या दोन लोकप्रिय एसयूव्ही हॅरियर आणि सफारीचे नवीन अ‍ॅडव्हेंचर एक्स व्हेरिएंट लाँच केले. हॅरियरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १८.९९ लाख रुपये आहे आणि सफारीची एक्स-शोरूम किंमत १९.९९ लाख रुपये आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2025 | 11:05 PM
कमी किंमत... स्मार्ट फीचर्स! Tata Harrier आणि Safari अॅडव्‍हेंचर X व्हेरिएंट लाँच, काय आहे किंमत?

कमी किंमत... स्मार्ट फीचर्स! Tata Harrier आणि Safari अॅडव्‍हेंचर X व्हेरिएंट लाँच, काय आहे किंमत?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या प्रमुख एसयूव्‍ही टाटा हॅरियर आणि टाटा सफारीमध्‍ये ऑल-न्‍यू अॅडव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंट लाँच केले. या नवीन व्हेरिएंटसह कंपनीने साहस, कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांचे परिपूर्ण पॅकेज सादर केले आहे, जेथे ही ग्राहकांना उत्तम मूल्‍य प्रस्‍ताव आणि प्रबळ व साहसी जीवनशैलीचा अनुभव देत आहे.

आकर्षक दरामध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट वैशिष्‍ट्ये असलेल्‍या हॅरियर व सफारी अॅडव्‍हेंचर व्हेरिएंटमध्‍ये एडीएएएससह अॅडप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल (एटी), ३६०० एचडी सराऊंड व्‍ह्यू, ट्रेल होल्‍ड ईपीबीसह ऑटो होल्‍ड, ट्रेल रिस्‍पॉन्‍स मोड्स (नॉर्मल, रफ, वेट), लँड रोव्‍हर-संचालित कमांड शिफ्टर (एटी) अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये, तसेच विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्ये जसे एर्गो लक्‍स ड्रायव्‍हर सीटसह मेमरी अँड वेलकम फंक्‍शन, २६.०३ सेमी अल्‍ट्रा-व्‍ह्यू ट्विन स्क्रिन सिस्‍टम, ट्रेल सेन्‍स ऑटो हेडलॅम्‍प्‍स, अॅक्‍वा सेन्‍स वायपर्स आणि मल्‍टी ड्राइव्‍ह मोड्स (सिटी, स्‍पोर्ट, इको) आहेत. हे व्हेरिएंट आजपाासून हॅरियर अॅडव्‍हेंचर एक्‍ससाठी १८.९९ लाख रूपये आणि सफारी अॅडव्‍हेंचर एक्‍स+ व्हेरिएंटसाठी १९.९९ लाख रूपये या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असतील.

‘या’ स्कूटरने केलं मार्केट जाम! फक्त 57990 मिळतेय ही भारी स्कूटर्स! फूल चार्जमध्ये देतात धुवाधार रेंज

या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचसह टाटा मोटर्सने हॅरियर व सफारी लाइनअपची आकर्षकता वाढवली आहे, जेथे ही श्रेणी आता अधिक उच्‍च एसयूव्‍ही विभागामध्‍ये अधिक स्‍मार्ट बनली आहे. व्‍हेरिएण्‍ट्स आणि नवीन रंगांच्‍या पर्यायांसह ही लाइन-अप नवीन प्‍युअर एक्‍स व्हेरिएंटसह देखील येते, जी ग्राहकांना आकर्षक दरामध्‍ये वाढीव मूल्‍य देईल. हॅरियरचे स्‍मार्ट, प्‍युअर एक्‍स, अॅडव्‍हेंचर एक्‍स, अॅडव्‍हेंचर एक्‍स+, फीअरलेस एक्‍स आणि फीअरलेस एक्‍स+ व्हेरिएंट अनुक्रमे १४,९९,९९०, १७,९९,०००, १८,९९,०००, १९,३४,०००, २२,३४,००० आणि २४,४४,००० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. सफारीचे स्‍मार्ट, प्‍युअर एक्‍स, अॅडव्‍हेंचर एक्‍स+, अकॉम्‍प्‍लीश एक्‍स, अकॉम्‍प्‍लीश एक्‍स + (७एस) आणि अकॉम्‍प्‍लीश एक्‍स + (६एस) व्हेरिएंट अनुक्रमे १५,४९,९९०, १८,४९,०००, १९,९९,०००, २३,०९,०००, २५,०९,००० आणि २५,१९,००० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स यांनी सांगितले की, ”हॅरियर आणि सफारी नेहमी गतीशीलतेपेक्षा अधिक सुविधेसाठी ओळखल्‍या गेल्‍या आहेत. या एसयूव्‍ही दर्जा, उद्देश आणि साहसी जीवनशैलीसाठी सखोल रूजलेली महत्त्वाकांक्षा सादर करतात. अॅडव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंटच्‍या लाँचसह आम्‍ही नवीन युगासाठी या आयकॉन्‍सचे आधुनिकीकरण केले आहे, जे व्‍यक्तिमत्त्व, अचूकरित्‍या तयार केलेली डिझाइन आणि सर्वोत्तम क्षमतेमध्‍ये अग्रस्‍थानी आहेत, तसेच प्रति कार अधिक मूल्‍य देतात. प्रामाणिकपणा, क्षमता व अभिव्‍यक्‍तीचा शोध घेणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या अॅडव्‍हेंचर एक्‍सची किंमत विभागामध्‍ये लक्षवेधक व किफायतशीर आहे, तसेच या एसयूव्‍हीमध्‍ये दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत. याव्‍यतिरिक्‍त, या नवीन व्हेरिएंटसह आम्‍ही हॅरियर आणि सफारी लाइन-अपला पूर्णत: नवीन लूक दिला आहे, ज्‍यामुळे ही श्रेणी उच्‍च एसयूव्‍ही क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक सर्वोत्तम, सुव्‍यवस्थित आणि मूल्‍य-संपन्‍न बनली आहे.”

अॅडव्‍हेंचर एक्‍स हॅरियर व सफारी लाइन-अप खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी वैशिष्‍ट्यांनी संपन्‍न पर्याय आहे. लँड रोव्‍हरच्‍या लीजेण्‍डरी डी८ प्‍लॅटफॉर्ममधून घेतलेल्‍या प्रमाणित ओएमईजीएआरसी आर्किटेक्‍चरवर निर्माण आणि शक्तिशाली २.० लीटर क्रियोटेक डिझेल इंजिनची शक्‍ती असलेले हॅरियर व सफारी अॅडव्‍हेंचर एक्‍स परसोना कार्यक्षमता-संचालित अनुभव देतात. साहसी व आकर्षक उपस्थितीसह हॅरियर व सफारी प्रत्‍येक रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात, जेथे सर्वोत्तम प्रमाण, उच्‍चस्‍तरीय बोनेट आणि उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग स्थितीच्‍या माध्‍यमातून अस्‍सल एसयूव्‍हीचे पैलू दिसून येतात. विशिष्‍टतेला अधिक लक्षवेधक करत हॅरियरमध्‍ये आकर्षक आर१७ टायटन फोर्ज अलॉइ आणि दरवाज्‍यांवर सिग्‍नेचर ब्रॅड मॅस्‍कॉट आहे, तर सफारीमध्‍ये आकर्षक आर१८ अॅपेक्‍स फोर्ज अलॉइसह स्‍वत:चे आयकॉनिक मॅस्‍कॉट आहे. यामधून या एसयूव्‍हींचा संपन्‍न वारसा प्रशंसित करण्‍यात आला आसून समकालीन आकर्षकता देखील दिसून येते.

एक्‍स्‍प्‍लोरर्ससाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या, तसेच साहसी प्रवासासाठी सुधारित करण्‍यात आलेल्‍या टाटा सफारी अॅडव्‍हेंचर एक्‍स आणि हॅरियर अॅडव्‍हेंचर एक्‍स या दोन विशिष्‍ट अवतारांमध्‍ये क्षमता, आरामदायीपणा व लक्षवेधक आकर्षकता आहे. सफारी अॅडव्‍हेंचर एक्‍स टॅन ओन-प्रेरित लेदरेटमधील अॅडव्‍हेंचर ओक इंटीरिअर्स आणि शिल्‍पाकृती डॅशसह वरचढ ठरते, तर हॅरियर अॅडव्‍हेंचर एक्‍स केबिनमध्‍ये टॅन अॅसेंट्स असलेल्‍या काळ्या रंगाच्‍या लेदरेट सीट्ससह प्रीमियम ओनिक्‍स ट्रेल इंटीरिअर्सच्‍या माध्‍यमातून एसयूव्‍हीची क्षमता सादर करते.

अॅडव्‍हेंचर एक्‍सच्‍या पदार्पणासह टाटा मोटर्सने संपूर्ण हॅरियर व सफारी पोर्टफोलिओला नवीन लुक दिला आहे, ज्‍यामुळे ही श्रेणी आता अधिक स्‍मार्ट, अधिक सर्वोत्तम आणि आजच्‍या एसयूव्‍ही ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षांची संलग्‍न झाली आहे. ही नवीन लाइन-अप तुमच्‍या जीवनशैलीला साजेशी आकर्षक एसयूव्‍हीची निवड करणे अधिक सोपे करते. हॅरियर किंवा सफारी आता सर्वोत्तम तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन किंवा शक्तिशाली क्षमता अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह डिझाइन करण्‍यात आली आहे. या लाइन-अपची खासियत म्‍हणजे ऑल-न्‍यू अॅडव्‍हेंचर एक्‍स परसोना, जी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अभिव्‍यक्‍ती आहे आणि त्‍यामध्‍ये सिग्‍नेचर डिझाइन, ऑफ-रोड सुसज्‍जता व प्रीमियम वैशिष्‍ट्ये आहेत.

Oben Rorr EZ Sigma बाईक लाँच, नवीन फीचर्ससह मिळणार १७५ किमी रेंज, काय आहे किंमत?

Web Title: Tata harrier adventure x and x plus variant launched price at rs 18 99 lakh features mileage details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 11:05 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • Tata

संबंधित बातम्या

ज्याला पाहावं तो हीच कार करतोय खरेदी! विक्री सुसाट, 6.25 लाख किमतीत देते 31 KM चा मायलेज
1

ज्याला पाहावं तो हीच कार करतोय खरेदी! विक्री सुसाट, 6.25 लाख किमतीत देते 31 KM चा मायलेज

Suzuki Access 125 vs Hero Destini 125: तुमच्यासाठी पैसे वसूल स्कूटर कोणती? चला जाणून घेऊयात
2

Suzuki Access 125 vs Hero Destini 125: तुमच्यासाठी पैसे वसूल स्कूटर कोणती? चला जाणून घेऊयात

अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्समुळे ‘हा’ प्रीमियम हेल्मेट चर्चेत! अपेक्षित किंमत 17,000 ते 20,000 रुपये
3

अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्समुळे ‘हा’ प्रीमियम हेल्मेट चर्चेत! अपेक्षित किंमत 17,000 ते 20,000 रुपये

आला रे आला डिस्काउंट आला! ‘या’ SUVs वर 2.50 लाखांपय रुपये वाचण्याची संधी
4

आला रे आला डिस्काउंट आला! ‘या’ SUVs वर 2.50 लाखांपय रुपये वाचण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.