
Tata Motorsचा ग्राहकांना मोठा धक्का! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
टाटा मोटर्सच्या या निर्णयाचा परिणाम फक्त पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर होणार नाही. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींमध्येही बदल होणार आहेत. त्यामुळे टियागो, पंच, नेक्सॉन यांसारख्या लोकप्रिय गाड्यांसोबत त्यांच्या इलेक्ट्रिक आवृत्त्याही ग्राहकांच्या बजेटवर थोडा अधिक भार टाकू शकतात.
टाटा मोटर्सच्या कारना भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. विशेषतः पंच आणि नेक्सॉनसारख्या एसयूव्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात. त्यामुळे दरवाढीचा परिणाम अनेक ग्राहकांच्या कार खरेदीच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे. Tata Motors Car Price Hike 2026:
FASTag Rules in Mumbai: 1 एप्रिलपासून FASTagचे नवे नियम! ‘या’ वाहनांना मिळणार टोलमधून खास सूट
काही व्हेरियंटमध्ये ही वाढ 25 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठीही ही बातमी महत्त्वाची आहे. टियागो ईव्ही, पंच ईव्ही आणि नेक्सॉन ईव्ही यांच्या किमतीतही वाढ होणार आहे. बॅटरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खर्चात झालेली वाढ हे त्यामागील एक कारण मानले जात आहे.
जर तुम्ही आधीपासून टाटाची कार घेण्याचा विचार करत असाल, तर ऑगस्टच्या शेवटपर्यंत निर्णय घेणे फायदेशीर ठरू