Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors च्या कमाईत वाढ! ‘या’ शहरात मिळाली अतिरिक्त इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

टाटा मोटर्स आपल्या उत्तम आणि हाय परफॉर्मन्स वाहनांसाठी ओळखली जाते. आता कंपनीला बंगळुरूमध्ये 148 स्‍टारबस इलेक्ट्रिक बसेसची अतिरिक्‍त ऑर्डर मिळाली. यामुळे नक्कीच कंपनीच्या कमाईत भर पडणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 19, 2024 | 07:25 PM
Tata Motors च्या कमाईत वाढ! 'या' शहरात मिळाली अतिरिक्त इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

Tata Motors च्या कमाईत वाढ! 'या' शहरात मिळाली अतिरिक्त इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये दमदार वाहनं ऑफर करत असतात. त्यातही कंपनीची वाहनं फक्त सामान्य ग्राहक नाही सरकारकडून देखील पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी खरेदी केल्या जातात. आता कंपनीला बंगळुरूमध्ये अतिरिक्त इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे बंगळुरूमधील वाहतूक अजूनच पर्यावरणपुरक होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) कडून 148 इलेक्ट्रिक बसेसची अतिरिक्‍त ऑर्डर मिळवली आहे. टाटा मोटर्सची पूर्णत: मालकीची उपकंपनी टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लि. 12 वर्षांच्‍या कालावधीसाठी टाटा स्‍टारबस ईव्‍ही १२-मीटर लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, कार्यसंचालन आणि देखभाल करण्‍याची जबाबदारी पार पाडेल. ही ऑर्डर पूर्वीच्‍या 921 इलेक्ट्रिक बसेसच्‍या ऑर्डरनंतर मिळाली आहे, जेथे बहुतांश बसेस डिलिव्‍हर करण्‍यात आल्या आहेत आणि बीएमटीसीद्वारे 95 टक्‍क्‍यांहून अधिक अपटाइमसह यशस्‍वीपणे चालवल्‍या जात आहेत.

Year Ender 2024: ‘या’ कंपन्यांनी Best Electric Cars बाजारात आणून 2024 केले आपल्या नावावर

टाटा स्‍टारबस ईव्‍हीमध्‍ये शाश्‍वत व आरामदायी प्रवास अनुभवासाठी उच्‍च दर्जाची डिझाइन आणि दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत. या शून्‍य–उत्‍सर्जन इलेक्ट्रिक बसेस बेंगळुरू शहरामध्‍ये सुरक्षित, आरामदायी व सोईस्‍कर आंतर-शहरीय प्रवासासाठी प्रगत बॅटरी सिस्‍टम्‍सची शक्‍ती असलेल्‍या नेक्‍स-जनरेशन आर्किटेक्‍चरवर विकसित करण्‍यात आल्‍या आहेत.

कंपनीतील वरिष्ठांचे विचार

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत बीएमटीसीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक रामचंद्रन आर, आयएएस म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या ताफ्याच्‍या आधुनिकीकरणासाठी या अतिरिक्‍त 148 इलेक्ट्रिक बसेससह टाटा मोटर्ससोबतचा आमचा सहयोग अधिक दृढ करण्‍याचा आनंद होत आहे. टाटा इलेक्ट्रिक बसेस अपवादात्‍मक असण्‍यासोबत शाश्‍वत व कार्यक्षम सार्वजनिक परिवहनाप्रती आमच्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न आहेत. मोठा ई-बस ताफा बेंगळुरूच्‍या नागरिकांना पर्यावरणपूरक, आरामदायी व विश्‍वसनीय सेवा देण्‍यासाठी आमच्‍या क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवेल.”

टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) आसिम कुमार मुखोपाध्‍याय म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या ई-मोबिलिटी सोल्‍यूशन्‍समधील बीएमटीसीच्‍या सातत्‍यपूर्ण विश्‍वासाचा अभिमान वाटतो. 148 बसेसच्‍या अतिरिक्‍त ऑर्डरमधून आमच्‍या स्‍टारबस ईव्‍हींचे प्रमाणित यश आणि बेंगळुरूच्‍या शहरी वातावरणामध्‍ये वितरित कार्यरत सर्वोत्तमता दिसून येते. आम्‍ही नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, ज्‍यांचा समुदाय व पर्यावरणाला फायदा होतो.”

Year Ender 2024: ‘या’ आहेत 2024 मधील Best Cars, खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच असते गर्दी

आजपर्यंत, टाटा मोटर्सच्‍या ई-बसेसने बेंगळुरूमध्‍ये एकूण 2.5 कोटी किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास केला आहे. याचे श्रेय टेलपाइप उत्‍सर्जनामधील मोठ्या कपातीला जाते, जेथे जवळपास 14000 टन कार्बन डायऑक्‍साईड उत्‍सर्जन कमी झाले. बेंगळुरूमध्‍ये टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसेसच्‍या यशामधून कंपनीची नाविन्‍यता, शाश्‍वतता आणि प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून शहरी जीवन सुधारण्‍याप्रती समर्पितता दिसून येते.

Web Title: Tata motors got the order of 148 electric buses from bengaluru metropolitan transport corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 07:25 PM

Topics:  

  • tata motors

संबंधित बातम्या

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
1

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
2

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
3

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी
4

ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.