फोटो सौजन्य: iStock
2024 मध्ये देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढताना दिसली. हीच वाढती मागणी पाहता अनेक कार उत्पादक कंपनीने देशात अत्याधुनिक फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या होत्या. हे वर्ष इलेक्ट्रिक कार्ससाठी खूपच आशादायी ठरले. या वर्षी स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्यांनी उत्तम इलेक्ट्रिक कार्स ऑफर केल्या आहेत. चला आज याच 2024 मधील बेस्ट कार्सबद्दल जाणून घेऊया.
17 जानेवारी 2024 रोजी भारतीय बाजारपेठेत Tata Punch EV लाँच करण्यात आली होती. यात दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत, जे 25 kWh आणि 35 kWh आहेत. त्याचे 25 kWh प्रकार 315 किमी आणि 35 kWh व्हेरियंट 421 किमी पर्यंत रेंज देते. या कारची किंमत 10 लाखांपासून 14.29 पर्यंत असू शकते.
Year Ender 2024: ‘या’ आहेत 2024 मधील Best Cars, खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच असते गर्दी
Tata Curvv EV भारतात 7 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आली होती . यात 45 kWh आणि 55 kWh बॅटरी पॅकचा पर्याय आहे, जो 430 किमी आणि 502 किमी पर्यंतची रेंज देते. या कारची किंमत 17.50 लाख ते 22 लाख रुपयांदरम्यान असू शकते
महिंद्राने 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात त्यांच्या ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ सब-ब्रँड अंतर्गत XEV 9e आणि BE 6 लाँच केले आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक SUV मध्ये 59 kWh आणि 79 kWh चे बॅटरी पॅक आहेत. XEV 9e मधील 59 kWh बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 656 किमी पर्यंतची रेंज देईल आणि BE 6 मधील बॅटरी एका चार्जमध्ये 500 किमी पर्यंतची रेंज देईल. XEV 9e ची किंमत 21.90 लाख रुपये आहे तर BE 6 18.90 लाख रुपये आहे.
MG ने 11 सप्टेंबर रोजी भारतात Windsor EV लाँच केली आहे. यात 38 kWh बॅटरी पॅक आहे, जे एका चार्जवर 332 किमी पर्यंतची रेंज देतो. कंपनी ही कार 3.5 रुपये प्रति किलोमीटर मॉडेलमध्येही देत आहे. या कारची किंमत 10 लाखांपासून ते 15.50 लाख रुपयांदरम्यान आहे.
अखेर Kia Syros झाली लाँच, मिळणार दमदार फीचर्स, ‘या’ महिन्यापासून सुरु होणार बुकिंग
Kia ने 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारतात आपली इलेक्ट्रिक कार EV9 लाँच केली. ही तीन-रो सीट एसयूव्ही आहे. यात 99.8 kWh बॅटरी आहे, जी एका चार्जवर 561 किमी पर्यंतची रेंज देते. या कारची किंमत तब्बल 1.3 कोटी रुपये आहे.
BYD ने 8 ऑक्टोबर 2024 रोजी भारतात eMAX 7 लाँच केली होती. यात 55.4 kWh आणि 71.8 kWh बॅटरी पॅक पर्याय आहेत. एका चार्जमध्ये ते 530 किमीपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. या कारची किंमत रु. 26.90 लाख ते रु. 29.90 लाख असू शकते.