Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors मिळाली जबरदस्त ऑर्डर ! ‘या’ राज्‍य परिवहन महामंडळाला तब्बल १००० चेसिसचा करणार पुरवठा

टाटा मोटर्स या भारतातील व्यावसायिक वाहन क्षेत्रातील मोठ्या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. देशातील महत्वाच्या राज्यात तब्बल १००० बस चेसिसचा पुरवठा मोटर्स करणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 23, 2024 | 04:41 PM
फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ

Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीच्या बस चेसिसला  मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता  उत्तर प्रदेश राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाकडून (यूपीएसआरटीसी) टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिसच्‍या १,००० युनिट्सचा पुरवठा करण्‍यासाठी प्रतिष्ठित ऑर्डर मिळाल्‍याची घोषणा केली आहे. सरकारने निविदा प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धात्‍मक ई-बिडिंग प्रक्रियेनंतर टाटा मोटर्सला ही ऑर्डर मिळाली आहे. कंपनीकडून यूपीएसआरटीसीला बस चेसिसचा पुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने केला जाणार आहे.

हे देखील वाचा-‘ही’ सेडान कार खरेदी करण्यासाठी भारतीयांची झुंबड, विक्रीच्या बाबतीत गेल्या सहा महिन्यापासून अव्वल स्थानी

गेल्यावर्षी मिळाली होती तब्बल  १,३५० चेसिसची ऑर्डर

टाटा मोटर्सला गेल्यावर्षीही  यूपीएसआरटीसीद्वारे १,३५० ची ऑर्डर मिळाली होती.  या बस चेसिसच्या  मोठ्या ऑर्डरची यशस्‍वीरित्‍या पूर्तता केल्‍यानंतर यूपीएसआरटीसीकडून पुन्हा १००० बस चेसिसची  ही ऑर्डर मिळाली आहे.टाटा मोटर्सच्या बस चेसिसचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरशहरीय व लांब अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेले टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिस उच्‍च दर्जाची कार्यक्षमता आणि सर्वोत्तम पॅसेंजर कम्‍फर्टसह कमी टोटल कॉस्‍ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) देते.

सार्वजनिक परिवहनाला विस्‍तारित व सुधारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये सहयोग

ही ऑर्डर मिळाल्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्‍यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस म्‍हणाले, ”आम्‍हाला यूपीएसआरटीसीसोबत सार्वजनिक परिवहनाला विस्‍तारित व सुधारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये सहयोग सुरू ठेवण्‍याचा आनंद होत आहे. टाटा एलपीओ १६१८ बस चेसिस प्रबळ व विश्‍वसनीय गतीशीलतेसह उच्‍च अपटाइम आणि कमी देखभाल व कार्यसंचालन खर्च देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आम्‍ही यूपीएसआरटीसीच्‍या मार्गदर्शनानुसार पुरवठा सुरू करण्‍यास उत्‍सुक आहोत.”

हे देखील वाचा-Hero Splendor Plus खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी ! बजाज मॉलकडून देण्यात आलीय ‘ही’ खास ऑफर

विविध राज्यातील प्रमुख शहरे आणि परिवहन महामंडळांना टाटाच्या बसेसचा पुरवठा

टाटा मोटर्स कंपनी  भारतभरातील विविध राज्यातील प्रमुख शहरांना व तसेच परिवहन मंडळांना प्रगत बसेस आणि सार्वजनिक परिवहन सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या असंख्य बसेस देशातील कानाकोपऱ्यातील रस्‍त्‍यांवर यशस्‍वीरित्‍या धावत आहेत. या बसेसमुळे देशातील प्रमुख शहरे, निम्न शहरे आणि दुर्गम भागांपर्यंत दळणवळणाची सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच लाखो प्रवाशांना दररोज आरामदायी व सुखकर प्रवासाचा आनंद देत आहेत.

Web Title: Tata motors has received a huge order to supply around 1000 chassis to the uttar pradesh state transport corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 04:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.