फोटो सौजन्य- सोशल मीडिया
एका कारने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या कारने 50 हजार कार युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार केला आहे. ही कार आहे Volkswagen Virtus. फॉक्सवॅगन कंपनीसाठी Virtus ही भारतीय बाजारपेठेतील महत्वपूर्ण कार ठरली आहे. मे 2024 पासून ही कार सेडान प्रकारातील सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. या कारचे भारतात जून 2022 मध्ये लॉंचिग झाले होते. त्यानंतर या कारला भारतीय ग्राहकांनी पसंती दिली आणि विक्रीच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी या कारने केली आहे.
Volkswagen Virtus चे दर महिन्यामध्ये सरासरी 1700 युनिट्सची विक्री होत आहे. यासोबत कंपनीच्या Virtus आणि Taigun यांची एकत्रित विक्री पाहिल्यास जुलै ते सप्टेंबर या तीमाहीत 1 लाखाहून जास्त विक्रीचा आकडा पार केला आहे. या दोन्ही कार्सनी भारतातील विक्रींमध्ये कंपनीसाठी 18.5 टक्के योगदान दिले आहे.
शक्तिशाली इंजिनामुळे कारची लोकप्रियता
Volkswagen Virtus या कारच्या लोकप्रियतेचे सर्वात प्रमुख कारण आहे या कारमध्ये असलेले दोन शक्तिशाली इंजिन पर्याय, या शक्तिशाली इंजिन पर्यायांमुळे ही कार सेडान प्रकारातील सर्वात शक्तिशाली कार बनते. Virtus मध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे.
कारमध्ये आहेत प्रीमियम वैशिष्ट्ये
Virtus मध्ये अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांचा समावेश केला गेला आहे. ज्यामध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि सनरूफ यांचा समावेश आहे. तसेच कारमध्ये वायरलेस फोन चार्जर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि हवेशीर फ्रंट सीट्स सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
कार सुरक्षेमध्येही अव्वल
फॉक्सवॅगन व्हरटसची 2023 मध्ये ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंगही मिळाले आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांचा विचार केल्यास कारमध्ये 6 एअरबॅग्ज (स्टँडर्ड), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट, रेन सेन्सिंग वायपर ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि रिअर पार्किंग कॅमेरा इत्यादींचा समावेश आहे.
कारची किंमत आणि स्पर्धा
Volkswagen Virtus ची भारतातील एक्स शो रुम किंमत 11.56 लाख रुपये ते 19.41 लाख रुपये या दरम्यान आहे. देशामध्ये या कारची स्पर्धा ही प्रामुख्याने मारुती सियाझ ,ह्युंदाई वेर्ना, होंडा सिटी आणि स्कोडा स्लाव्हिया यांसारख्या कारशी आहे.