Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors चा ‘लखनौ’मध्ये डंका! ३५ वर्षांच्या प्रवासात १० लाख व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनाचा टप्पा पूर्ण!

टाटा मोटर्सने एक महत्वाची कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीने लखनौ प्लांटमध्ये १० लाख व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 15, 2026 | 08:07 PM
फोटो सौजन्य: Istock

फोटो सौजन्य: Istock

Follow Us
Follow Us:

Tata Motors ने उत्तर प्रदेशातील लखनौ प्लांटमध्ये १० लाख व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या निमित्ताने कंपनीने आपल्या ३५ वर्षांच्या औद्योगिक प्रवासाचा आणि राज्याच्या आर्थिक व कौशल्य विकासातील योगदानाचा गौरव केला. विशेष म्हणजे, या टप्प्यात तयार झालेले १० लक्षवे वाहन हे शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बस असून, पर्यावरणपूरक गतीशीलतेकडे टाटा मोटर्सच्या वाटचालीचे ते प्रतीक आहे.

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath, टाटा सन्सचे अध्यक्ष Natarajan Chandrasekaran, तसेच उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि टाटा मोटर्सचे एमडी व सीईओ गिरीश वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते १० लक्षव्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत स्वस्त आणि फीचर्स जबरदस्त

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “लखनौ प्लांटमधील १० लाख वाहनांचे उत्पादन हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील औद्योगिक क्षमता आणि कुशल मनुष्यबळाची ताकद अधोरेखित होते.” त्यांनी राज्याला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या ध्येयात उद्योगांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही नमूद केले.

१९९२ मध्ये स्थापन झालेला हा प्लांट आज टाटा मोटर्सच्या प्रमुख उत्पादन केंद्रांपैकी एक बनला आहे. जवळपास ६०० एकर क्षेत्रावर पसरलेल्या या केंद्रात ट्रक, बस तसेच इलेक्ट्रिक आणि फ्युएल-सेल वाहनांचे उत्पादन केले जाते. वार्षिक एक लाखाहून अधिक वाहनांची उत्पादन क्षमता असलेल्या या प्लांटमधून तयार होणारी वाहने देशांतर्गत वापरासोबत निर्यातीसाठीही पाठवली जातात.

बाबो, 1 लिटर इंधनावर 45 किमीचा मायलेज! जगातील सर्वात जास्त मायलेज देणारी Hybrid Car आली

या प्लांटमुळे ८,००० हून अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला असून, विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासाला चालना मिळत आहे. विशेष म्हणजे, हा प्लांट १००% नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालतो आणि वॉटर-पॉझिटिव्ह असल्यामुळे पर्यावरण संरक्षणालाही मोठा हातभार लागतो.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, “उत्तर प्रदेशसोबतची आमची भागीदारी औद्योगिक प्रगती आणि सामाजिक विकासाचे उत्तम उदाहरण आहे.” एकूणच, हा टप्पा टाटा मोटर्सच्या शाश्वत आणि भविष्याभिमुख गतीशीलतेच्या दिशेने महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: Tata motors lucknow plant 1 million commercial vehicles milestone electric bus 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • automobile
  • Lucknow
  • tata motors

संबंधित बातम्या

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
1

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
2

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
4

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.