फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Tata Nexon Facelift ने BNCAP (Bharat New Car Assessment Programme) क्रॅश चाचणी उत्तीर्ण केली आहे. यासंबंधी रेटिंग आज दि. 16 ऑक्टोबर 2024 ला प्रसिद्ध करण्यात आले आहे. टाटा मोटर्सच्या या लोकप्रिय असलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने प्रौढांसाठी तसेच लहान मुलांसाठी सुरक्षिततेची चाचणीमध्ये 5 स्टार रेंटिंग मिळविले आहे. कारला मिळालेले हे रेटिंग पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या मॉडेलसाठी लागू आहे. या कारच्या Tata Nexon EV या मॉडेलने या आधीच BNCAP चाचणी 5-स्टार रेटिंगसह उत्तीर्ण केली आहे.
Tata Nexon BNCAP चाचणीत मिळालेले गुण
टाटा नेक्सॉन फियरलेस डिझेल एएमटी मॉडेल या वेरिएंटची BNCAP अंतर्गत चाचणी केली गेली ह. ही चाचणी रेटिंग टाटा नेक्सॉनच्या सर्व मॉडेल्सना लागू आहे. या टेस्टमध्ये कारला मिळालेले गुणांमध्ये ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) अंतर्गत, Nexon ला एकूण 32 पैकी 29.41 गुण मिळाले. चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP)अंतर्गत, Nexon ने 49 पैकी 43.83 गुण मिळवले. जर Nexon EV च्या गुणांचा विचार केल्यास नेक्सॉन ईव्हीला 29.86 आणि COP साठी 44.95 चे गुण ऐवढे होते.
टाटा नेक्सॉनमध्ये असणारी सुरक्षा वैशिष्ट्ये
Tata Nexon मधील सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आ सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, ISOFIX, ट्रॅक्शन कंट्रोल, रोल-ओव्हर मिटिगेशन आणि बरेच काही समाविष्ट आहे. टाटा नेक्सॉनच्या प्री-फेसलिफ्ट आवृत्तीलाही फाइव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे नेक्सॉनच्या अनेक प्रकारातील वाहनांना BNCAP रेटिंग मिळाले आहे.
Tata Nexon इंजिन आणि किंमत
नेक्सॉन फेसलिफ्ट ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायासह उपलब्ध आहे. कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन 120 hp आणि 170 Nm पीक टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, डिझेल वेरिएंटमध्ये 1.5-लिटर युनिट मिळते जे 115hp आणि 260 Nm आउटपुट तयार करते. टाटा नेक्सॉनची एक्स शो रुम किंमत ही 7.99 लाख रुपयांपासून सुरु होते ते 15.50 लाख पर्यंत जाते.