Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. येत्या 20 फेब्रुवारी 2026 ला टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 593.6 किमीची रेंज देऊ शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 09:27 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होण्याच्या मार्गावर
  • येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी ही कार लाँच होणार
  • एका चार्जवर मिळणार 593.6 किमीची रेंज
भारतात अनेक ऑटो कंपन्या बदलत्या काळानुसार त्यांच्या कार्समध्ये बदल करत असतात. आता लवकरच Tata Motors त्यांची लोकप्रिय कार Tata Punch EV चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. ही नवीन कार येत 20 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँचपूर्वी या अपडेटेड मॉडेलला अनेक वेळा कोणत्याही कव्हरशिवाय टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आले असून, त्यातून डिझाइनमधील बदल स्पष्टपणे दिसून आले आहेत. दरम्यान, कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये वाहनाची ड्रायव्हिंग रेंज दर्शवण्यात आली असून, एकदाच पूर्ण चार्ज केल्यानंतर ही ईव्ही तब्बल 593.6 किलोमीटरपर्यंत धावल्याचा दावा करण्यात आला आहे.

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट : बॅटरी आणि परफॉर्मन्स

यांत्रिकदृष्ट्या, फेसलिफ्टेड पंच ईव्हीमध्ये सध्या उपलब्ध असलेले 25kWh आणि 35kWh बॅटरी पॅक कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही पर्यायांमध्ये फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात येईल. 25kWh बॅटरी पॅकमध्ये मोटर 82hp पॉवर आणि 114Nm टॉर्क निर्माण करते, तर 35kWh बॅटरीमध्ये 122hp पॉवर आणि 190Nm टॉर्क मिळतो. सध्या ARAI प्रमाणित रेंज 25kWh व्हेरिएंटसाठी 265 किमी आणि 35kWh व्हेरिएंटसाठी 365 किमी इतकी आहे.

अलीकडील रेंज टेस्टनंतर अशी चर्चा सुरू आहे की, फेसलिफ्ट मॉडेलमध्ये Tata Nexon EV मधील 45kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास, पंच ईव्हीची रेंज आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

डिझाइनमध्ये काय बदल?

आगामी पंच ईव्ही फेसलिफ्टच्या एक्सटिरिअर डिझाइनमध्ये काही लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. पुढील भागात बंपर नव्याने डिझाइन करण्यात आला असून, पूर्वीच्या मॉडेलमधील ब्लॅक ट्रिम आणि कनेक्टिंग एअर इनटेक काढून टाकण्यात आले आहेत. एअर डॅम आणि स्किड प्लेटमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, परिचित Y-आकारातील एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स आणि मध्यभागी असलेला चार्जिंग फ्लॅप कायम ठेवण्यात आला आहे.

साइड प्रोफाइल बहुतांश विद्यमान मॉडेलसारखाच आहे. काही निवडक व्हेरिएंट्समध्ये नवीन अलॉय व्हील डिझाइन देण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान दिसलेले मॉडेल फिअरलेस रेड ड्युअल-टोन रंगात होते, ज्यामध्ये ब्लॅक रूफ देण्यात आली होती. याशिवाय ब्राउन आणि ब्राइट यलो असे नवीन रंग पर्यायही उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे.

मागील बाजूस, फेसलिफ्टेड पंच ईव्हीमध्ये अलीकडेच अपडेट झालेल्या पेट्रोल पंचचे स्टाइलिंग एलिमेंट्स देण्यात आले आहेत. यात फुल-विड्थ एलईडी लाइट बार आणि नव्या डिझाइनचा बंपर समाविष्ट आहे. त्यामुळे ईव्ही आणि त्याच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये अधिक सुसंगत आणि आकर्षक लुक मिळतो.

Web Title: Tata punch ev facelift version can give 593 km range on single charge know launch date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
1

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
2

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
3

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
4

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.