फोटो सौजन्य: Social Media
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे कित्येक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. याशिवाय जे ऑटो कंपनीज आधी फक्त पेट्रोल वाहनांची उत्पादन करत होते, आता ते सुद्धा इलेक्ट्रिक कार्स किंवा बाईक्स लाँच करत आहे.
आधी फक्त इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये लाँच होत होत्या. पण आता तर इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर सुद्धा लाँच होत आहे. देशात रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची किती क्रेज आहे हे सांगण्याची गरज नाही. आता कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक आणायच्या तयारीत आहे.
आपण सगळेच जाणतो, रॉयल एनफिल्ड भारतीय बाजारपेठेत अनेक उत्कृष्ट टू-व्हीलर ऑफर करते. नुकतेच कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक बाइकचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. चला या इलेक्ट्रिक बाईक बद्दल अधिक जाणून घेऊया.
अशी अपेक्षा आहे की कंपनी EICMA 2024 दरम्यान ही इलेक्ट्रिक बाईक सादर करू शकते. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत 350 ते 650 सीसी क्षमतेच्या इंजिनसह अनेक बाईक्स देणारी ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक असेल.
बाईक आणण्यापूर्वी रॉयल एनफिल्डने आपला पहिला टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये ही बाईक 4 नोव्हेंबर 2024 रोजी आणली जाणार आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये Save The Date 04.11.2024 असे लिहून आले आहे. यासोबतच कंपनीच्या वेबसाइटवरही ही माहिती देण्यात आली आहे.
कंपनी ही बाईक 4 नोव्हेंबरलाच सादर करेल. यानंतर जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे लाँच केले जाईल. हे भारत मोबिलिटी 2025 दरम्यान लाँच केले जाईल अशी अपेक्षा आहे.
सध्या या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी, रेंज आणि फीचर्सची माहिती उपलब्ध नाही आहे. पण कंपनीच्या इतर बाईक्सप्रमाणेच ती आधुनिक रेट्रो स्टाइलमध्ये आणली जाईल अशी अपेक्षा आहे. लॉचच्या वेळी याची अपेक्षित किंमत 4 ते 5 लाख रुपये असू शकते.