
Tata Punch CNG AMT Real World Mileage Test (फोटो सौजन्य-AI एआय)
टाटा पंच सीएनजी एएमटी ही भारतातील पहिली सीएनजी एएमटी एसयूव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे. पण ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या या कारमधून प्रत्यक्षात किती मायलेज मिळते, हा कस्टमरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. Moneycontrol ने केलेल्या Tata Punch CNG AMT Mileage टेस्टमध्ये या कारने 19.99 km/kg मायलेज नोंदवले. या चाचणीतून गॅसचा खर्च आणि शहर-हायवेवरील ड्रायव्हिंगचा अनुभवही समोर आला आहे.
या चाचणीसाठी टाटा मोटर्सने टॉप व्हेरिएंट असलेली Accomplished + S सीएनजी एएमटी कार दिली होती. दिल्लीतील सरिता विहार येथील इंद्रप्रस्थ गॅस स्टेशनवर रात्री जवळपास 11 वाजता कारमध्ये 6.950 किलो सीएनजी भरले गेले. गॅस भरण्यासाठी जवळपास 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर काही दिवसांत सुमारे 60 किलोमीटर हायवेवर आणि 79 किलोमीटर शहरातील रस्त्यांवर प्रवास करण्यात आला. संपूर्ण प्रवासात एसी सुरू होता.
दिवाळीत फक्त 4.69 लाखांत इलेक्ट्रिक कार घरी आणा! 315 KM रेंजसह 4 EV वर BaaS ऑफर
CNG संपल्यानंतर कारच्या 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर 138.9 किलोमीटरचे अंतर दिसले. सीएनजी मोडमध्ये प्रवासासाठी 5 तास 18 मिनिटे लागली होती. या अंतराला भरलेल्या गॅसच्या प्रमाणाने भागल्यावर 19.99 km/kg मायलेज मिळाले. चाचणीदरम्यान सीएनजीचा दर 86.98 रुपये प्रति किलो होता. त्यामुळे 6.950 किलो गॅससाठी 604.51 रुपये खर्च झाले. या हिशेबानुसार प्रत्येक किलोमीटरसाठी सुमारे 4.35 रुपये खर्च आला. याच मायलेजने 100 किलोमीटर प्रवास करण्यासाठी अंदाजे 5 किलो गॅस आणि 435 रुपये लागतील.
ड्रायव्हिंगच्या बाबतीत पंच सीएनजी एएमटी शहरातील संथ वाहतुकीत सहज हाताळता येते. पण गिअर बदलताना एएमटीला थोडा वेळ लागतो आणि 60 किलोमीटर प्रतितास वेगाच्या पुढे कारचा वेग हळूहळू वाढतो. खड्डे आणि तीव्र उंचवट्यांवर सस्पेन्शन थोडे कडक जाणवते. वळणांवर कार स्थिर राहते आणि बॉडी रोल कंट्रोलमध्ये असल्याचे चाचणीत दिसले.
या कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलिंडर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिन आहे. सीएनजी मोडमध्ये ते 73.4 PS पॉवर आणि 103 Nm टॉर्क देते, तर पेट्रोल मोडमध्ये 87.8 PS आणि 115 Nm मिळतात. 5-स्पीड मॅन्युअलसोबत 5-स्पीड एएमटीचा ऑप्शन आहे. बूट फ्लोअरखाली 2 सीएनजी सिलिंडर बसवले असून सामानासाठी 210 लिटर जागा मिळते. पेट्रोल टँक 37 लिटरचा आहे.
फीचर्समध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो-ॲपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग, व्हॉइस असिस्टेड सनरूफ आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचा समावेश आहे. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि 360-डिग्री कॅमेरा मिळतो. भारत एनसीएपीकडून या कारला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. पंच सीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.85 लाख रुपये आहे, तर चाचणीतील Accomplished + S सीएनजी एएमटी व्हेरिएंटची किंमत 10.77 लाख रुपये आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक सीएनजी एसयूव्ही घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा मायलेज टेस्टचा आकडा उपयोगी ठरू शकतो.
Ans: Moneycontrol च्या प्रत्यक्ष चाचणीत टाटा पंच सीएनजी एएमटीने 19.99 km/kg मायलेज नोंदवले.
Ans: चाचणीवेळी सीएनजीचा दर 86.98 रुपये प्रति किलो होता. त्या दरानुसार प्रति किलोमीटर सुमारे 4.35 रुपये खर्च आला.
Ans: टाटा पंच सीएनजीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.85 लाख रुपये आहे. चाचणीतील Accomplished + S सीएनजी एएमटी व्हेरिएंटची किंमत 10.77 लाख रुपये आहे.