
Volkswagen Compact SUV Launching in India by 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)
Volkswagen new SUV 2027 या कारची चर्चा सुरू झाली आहे. फोक्सवॅगन भारतात 2027 मध्ये नवीन सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही SUV भारतातच विकसित आणि तयार केली जाणार असून कंपनीच्या तायगुनपेक्षा खाली प्लेस मिळवेल. त्यामुळे फोक्सवॅगनच्या भारतीय लाइनअपमधील ही सर्वात स्वस्त SUV ठरण्याची शक्यता आहे. कंपनीने या मॉडेलची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती.
नवीन SUV च्या डिझाइनमध्ये सध्याच्या तायगुन आणि व्हर्चस फेसलिफ्टची झलक दिसू शकते. यात नवीन LED हेडलॅम्प, वेगळ्या DRL लाईट्स, रुंद फ्रंट ग्रिल आणि मोठ्या व्हील आर्चेस मिळण्याची शक्यता आहे. मागच्या बाजूला नव्या डिझाइनचे टेललॅम्प आणि बदललेला बंपर दिला जाऊ शकतो. ब्राझीलमध्ये विकल्या जाणाऱ्या फोक्सवॅगन टेरा मॉडेलचे नावही या चर्चेत येत असले, तरी भारतासाठीच्या SUV चे डिझाइन वेगळे असू शकते.
फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात 2027 मध्ये येणार; 19 km/l मायलेजसह मिळू शकते दमदार इंजिन
या SUV चा मेकॅनिकल आधार स्कोडा कायलॅकसोबत शेअर केला जाईल. दोन्ही गाड्यांमध्ये भारतासाठी विकसित केलेला MQB A0 IN प्लॅटफॉर्म वापरला जाईल. कायलॅकची लांबी 3,995 mm आणि व्हीलबेस 2,566 mm आहे. नवीन फोक्सवॅगन SUV चे मापही याच आसपास असण्याची शक्यता आहे. चाकन येथील फोक्सवॅगन ग्रुपच्या कारखान्यात तिचे प्रोडक्शन होऊ शकते. यामुळे स्थानिक पातळीवर पार्ट्सचा वापर वाढवणे शक्य होईल.
इंजिनसाठी कायलॅकमधील 1.0-लिटर, 3-सिलिंडर TSI टर्बो पेट्रोल युनिट मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क देते. कायलॅकमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहेत. पण फोक्सवॅगनच्या SUV मध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.
केबिनमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन, 8-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स आणि इलेक्ट्रिक सनरूफ मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ESC, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, हिल-होल्ड असिस्ट आणि TPMS दिले जाऊ शकतात. कायलॅकला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले आहेत.
या नवीन SUV ची एक्स-शोरूम किंमत 8 लाख ते 13 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. भारतात तिची स्पर्धा टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट आणि महिंद्रा XUV 3XO यांच्याशी होईल.
Ans: फोक्सवॅगनची नवीन सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV 2027 मध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Ans: या SUV मध्ये स्कोडा कायलॅकमधील 1.0-लिटर, 3-सिलिंडर TSI टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क देते.
Ans: या SUV ची एक्स-शोरूम किंमत 8 लाख ते 13 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.