Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

27 KM मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सनरूफ! नव्या रूपात येणार भारतातील सर्वात स्वस्त SUV

टाटा पंचचा फेसलिफ्ट व्हर्जन येणाऱ्या नवीन वर्षात लाँच होण्याची शक्यता आहे. या कारसाठी आधीच ग्राहक उत्सुक दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 21, 2025 | 07:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा पंचचा फेसलिफ्ट व्हर्जन येणार
  • मिळणार दमदार मायलेज
  • नवीन वर्षात ही नवीन कार लाँच होण्याची शक्यता
भारतीय ऑटो बाजारात अनेक विश्वासू ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावावरच त्यांचे कारचे हजारो युनिट्स विकल्या जातात. अशीच एक विश्वासू कंपनी म्हणजे Tata Motors. टाटाने विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर सुद्धा विशेष लक्ष ठेवत आहे. टाटाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Tata Punch. आता लवकरच या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात येणार आहे.

टाटा मोटर्स जानेवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात टाटा पंच फेसलिफ्ट लाँच करण्याची अपेक्षा आहे. या मायक्रो-एसयूव्हीला अधिक स्टायलिश, वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक मॉडर्न अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. ही कार अनेक वेळा टेस्टिंग करताना दिसली आहे. याच्या डिझाइन आणि केबिनमध्ये अनेक बदल होण्याची अपेक्षा आहे, तर इंजिन पर्याय सध्याच्या मॉडेलसारखेच राहतील अशी अपेक्षा आहे.

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवीन एक्सटिरिअर डिझाइन

टाटा पंच फेसलिफ्टचे एक्सटिरिअर मोठ्या प्रमाणात पंच ईव्हीपासून प्रेरित असण्याची शक्यता आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, अपडेटेड बंपर, शार्प एलईडी डीआरएल, नवीन अलॉय व्हील्स आणि रिफ्रेश केलेले टेललॅम्प असू शकतात. एकूणच, कार पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि प्रीमियम लूकमध्ये असेल.

दमदार फीचर्स आणि अपडेटेड इंटिरिअर

Tata Punch Facelift च्या केबिनमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, अपडेटेड डॅशबोर्ड लेआउट, 10.25-इंच मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल तसेच कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसारखी आधुनिक फीचर्स देण्यात येऊ शकतात.

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध

प्रवाशांच्या सेफ्टीच्या बाबतीत टाटा नेहमीच सेगमेंट-बेस्ट मानली जाते. नव्या Punch Facelift मध्ये 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड) देण्यात येण्याची शक्यता असून त्यासोबत ABS सह EBD, ESC, हिल होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारखी सेफ्टी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

इंजिन आणि माइलेज

Tata Punch Facelift मध्ये फारसे बदल होणार नाहीत. यामध्ये सध्याचेच 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येईल, जे सुमारे 88 PS पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत CNG व्हेरिएंटचा पर्यायही उपलब्ध राहणार आहे.

माइलेजच्या बाबतीत, पेट्रोल व्हेरिएंटमधून सुमारे 20 kmpl, तर CNG व्हेरिएंटमधून अंदाजे 27 km/kg पर्यंत माइलेज मिळण्याची शक्यता आहे.

किती असेल किंमत?

सध्याची टाटा पंचची किंमत 5.50 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. नवीन टाटा पंच फेसलिफ्टची किंमत 6.25 लाख (एक्स-शोरूम) ते 10 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत असण्याची अपेक्षा आहे. सुधारित डिझाइन, नवीन फीचर्स आणि मजबूत सेफ्टी पॅकेजसह, ते मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई एक्सटरला टक्कर देईल.

Web Title: Tata punch facelift will be launched in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • tata punch

संबंधित बातम्या

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ
2

MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध
3

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध

एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार
4

एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.