
फोटो सौजन्य: @BunnyPunia/ X.com
अलीकडेच टाटा मोटर्सने भारतीय बाजारात नवीन टाटा सिएरा लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये आहे. कंपनीने अद्याप सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत. सर्व व्हेरिएंटच्या किंमती डिसेंबर 2025 च्या मध्यापर्यंत जाहीर केल्या जातील. 16 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन बुकिंग सुरू होण्यापूर्वी आणि डीलरशिपवर बुकिंग सुरू होण्यापूर्वी किंमती जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा आहे.
प्रीमियम लूक आणि किंमत 2 लाखांच्या आत! Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट झाला लाँच
टाटा सिएरा ही Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+ अशा सात व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते, याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 20.5 लाखांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे. डिलिव्हरी जानेवारी 2026 च्या मध्यात सुरू होईल.
नवीन सिएरा तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. विविध ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य पर्याय उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.
हा हिशोब महत्वाचा! Tata Sierra ची टाकी फुल करण्यासाठी किती येईल खर्च? जाणून घ्या
सिएरा ही टाटाच्या नवीन मॉड्यूलर ARGOS प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे, जी प्रगत सेफ्टी, परफॉर्मन्स आणि भविष्यातील इंधन प्रकार आणि सीटिंग लेआऊट्स लक्षात घेऊन विकसित केली गेली आहे.
नवीन Tata Sierra अनेक लोकप्रिय SUV मॉडेल्सशी जोरदार स्पर्धा करणार आहे. यामध्ये Hyundai Creta, Maruti Grand Vitara, Maruti Victoris, Toyota Hyryder, Kia Seltos आणि Honda Elevate यांचा समावेश आहे.