
फोटो सौजन्य: iStock
टाटा सिएरा एसयूव्ही तीन 1.5-लिटर इंजिनांनी सुसज्ज आहे, जी 75.8 किलोवॅट पॉवर आणि 139 एनएम टॉर्क निर्माण करते. ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. 1.5 -लिटर पेट्रोल इंजिन 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी समाविष्ट आहे.
कंपनीकडून टाटा सिएरात अनेक अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत. यात सहा एअरबॅग, लेव्हल-2 आधारित 20 प्रकारचे ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS), ESP, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर वायपर आणि वॉशर, रियर डिफॉगर तसेच ISOFIX चाइल्ड सीट अँकरिंग यांसारखी महत्त्वाची सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
दुसरीकडे, होंडा एलीवेटमध्येही सुरक्षा फीचर्सची चांगली श्रेणी देण्यात आली आहे. यात सहा एअरबॅग, EBD, ESC, VSM, हिल-स्टार्ट कंट्रोल, CMBS, रियर डिस्क ब्रेक, सीटबेल्ट प्री-टेंशनर्स, थ्री-पॉइंट सीटबेल्ट रिमाइंडर, ISOFIX चाइल्ड अँकरिंग, ॲडाप्टिव क्रूज कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, लेन वॉच कॅमेरा, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑटो-डिमिंग IRVM, TPMS, पार्किंग सेन्सर्स, रियर कॅमेरा, ड्रायव्हर रिअर-व्ह्यू मॉनिटरिंग सिस्टम तसेच Level-2 ADAS यासारखे फीचर्स समाविष्ट केले आहेत.
टाटा सिएराची इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त बेस व्हेरिएंटसाठी लागू असून, इतर व्हेरिएंट्सच्या किंमतीची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे, होंडा एलीवेटची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते, तर तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.67 लाख रुपयांपर्यंत जाते.
जर तुम्हाला स्टायलिश लूक असणारी कार हवी असेल तर टाटा सिएरा तुमच्यासाठी योग्य कार आहे. मात्र, जर तुम्ही बेस व्हेरिएंट एसयूव्हीच्या शोधात असाल तर ही होंडा एलीवेट तुमच्यासाठी बेस्ट!