फोटो सौजन्य - Social Media
रेट्रो-स्टाइल बाइक्सचा भारतातील वेगाने वाढणारा सेगमेंट लक्षात घेता, W230 एक मजबूत स्पर्धक ठरू शकते. Royal Enfield Hunter 350 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सना W230 तीव्र स्पर्धा देऊ शकते. तसेच Kawasaki W230 चा लुक पाहिलात तर पूर्णतः ओल्ड-स्कूल क्लासिक डिझाइनवर आधारित आहे. गोल हेडलॅम्प, क्रोम-फिनिश फ्युअल टाकी, विंटेज साइड पॅनेल्स यामध्ये देण्यात आले आहेत तर पूर्णपणे विंटेज फील देणारा लुक असून शहरातील राइडसाठी हलके आणि सुलभ बॉडी प्रोफाइल यात दिसून येत आहे.
ही बाईक उंच रायडर्स तसेच उंचीने कमी असणाऱ्या रायडर्ससाठी ही फार उत्तम निवड आहे. इंजिन आणि परफॉर्मन्स पाहिला तर बाईक 233cc इंजिन असणारी आहे. यात एअर-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन (KLX 230 सारखेच बेस इंजिन) आहे. या इंजिनची पॉवर 18 PS इतकी आहे तर टॉर्क 18.6 Nm इतका जनरेट करते. W230 मध्ये गिअरिंग सेटअप वेगळा असून रिलॅक्स आणि कम्फर्ट-ओरिएंटेड राइडिंगसाठी ट्यून आहे.
Kawasaki W230 बाजारात कधी येणार? अशा प्रश्न साऱ्यांना लागून आहे. तसेच ही बाईक घेण्यासाठी रायडर्स आतुर्ले आहेत.






