
TATA Sierra vs Kia Seltos: कोणती SUV देते बेस्ट माइलेज? वाचा परफॉर्मंस आणि किंमतीमधील फरक
नॉन-टर्बोवाल्या पेट्रोल इंजिनच्या बाबतीत टाटा सिएराचे मायलेज किया सेल्टोसपेक्षा अधिक चांगले आहे. मॅनुअल गियरबॉक्ससह टाटा सिएरा किया सेल्टोसपेक्षा 0.9 किमी प्रति लीटर जास्त मायलेज देते. टाटा सिएराचे DCT मॉडेल, किया सेल्टोसच्या पेट्रोल-CVT मॉडेलच्या तुलनेत 0.4 किमी प्रति लीटर अधिक मायलेज देते. सिएराची सुधारित इंधन कार्यक्षमता तिच्या ॲटकिन्सन-पॉवर्ड इंजिनमुळे आहे, जे इंधनाचा वापर कमी करण्यास आणि इंधन कार्यक्षमता वाढविण्यात मदत करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिझेल इंजिनच्या बाबतीत किया सेल्टोसचे मायलेज टाटा सिएरापेक्षा कमी आहे. मॅनुअल गियरबॉक्समध्ये दोन्ही गाड्यांमध्ये 1.86 किमी प्रति लीटर आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्समध्ये 1.48 किमी प्रति लीटरचे अंतर आहे. म्हणजेच डिझेल मॉडेलमध्ये टाटा सिएरा जास्त मायलेज ऑफर करते. टर्बो-पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये किया सेल्टोसने बाजी मारली आहे. किया सेल्टोस टर्बो-DCT चे मायलेज टाटा सिएरा टर्बो-पेट्रोलच्या तुलनेत 2.2 किमी प्रति लीटर जास्त आहे. याशिवाय, किया सेल्टोसमध्ये टर्बो-पेट्रोल इंजिनसह iMT गियरबॉक्सचा पर्याय देखील मिळतो, जो 15.6 किमी प्रति लीटरचे मायलेज देतो.
टाटा सिएरा आणि किया सेल्टोस दोन्हीमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय मिळतात. यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लीटर डीझेल इंजिन यांचा समावेश आहे. टाटा सिएराचे पेट्रोल इंजिन 106hp शक्ती निर्माण करते, तर किया सेल्टोस115hp शक्ती निर्माण करते आणि 144nm चे टॉर्क जनरेट करते. दोन्ही गाड्यांचे टर्बो इंजिन 160hp शक्ती निर्माण करते. मात्र किया सेल्टोसमध्ये टॉर्क थोडा जास्त आहे (253nm) तर टाटा सिएरामध्ये 250nm आहे. टाटा सिएराचे डिझेल इंजिन 118hp शक्ती निर्माण करते आणि 260nm चा टॉर्क देते. (ऑटोमॅटिकमध्ये 280nm). किया सेल्टोस डीझेल 116hp निर्माण करते आणि 250nm चा टॉर्क जनरेट करते.
टाटा सिएराची एक्स-शोरू किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरु होऊन 21.29 लाख रुपयांपर्यंत जाते. तर किया सेल्टोसची एक्स-शोरूम किंमत 10.99 रुपयांपासून सुरु होऊन 190.99 लाख रुपयांदरम्यान आहे.
Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या
टाटा सिएराची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरु होऊन 21.29 लाख रुपयांपर्यंत जाते. तर किया सेल्टोसची एक्स-शोरूम किंमत10.99 लाख रुपयांपासून 19.99 लाख रुपयांदरम्यान आहे. दोन्ही मध्यम आकाराच्या एसयूव्ही असून, त्या ह्युंदाई क्रेटा, टाटा कर्व्ह, सिट्रोएन एअरक्रॉस आणि बसाल्ट, तसेच मारुती व्हिक्टोरिस आणि ग्रँड व्हिटारा यांच्याशी थेट स्पर्धा करतात.