गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क... किंमत 2 कोटींच्या घरात
Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या
BMW i7 ही कंपनीची सर्वात दमदार आणि शानदार अशी इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान आणि आराम यांचा संगम आहे. यामध्ये 101.7kWh ची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. या गाडीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत, ज्या एकत्र येऊन 544hp ची शक्ती आणि 745nm चे टॉर्क जनरेट करतात. ही गाडी केवळ 4.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग गाठते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही गाडी 591 ते 625 किमीचा प्रवास करू शकते. लांबच्या प्रवासासाठी ही गाडी एक आदर्श पर्याय ठरते. (फोटो सौजन्य – YouTube)
BMW i7 च्या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.05 करोड रुपये ठेवण्यात आली आहे. गायक जुबिन नौटियाल यांनी सेकंड हँड गाडी खरेदी केल्यामुळे त्यांना कमी पैसे मोजावे लागले असण्याची शक्यता आहे. भारतात कमी मायलेज असलेल्या सेकंड हँड BMW i7 ची किंमत 1.25 ते 1.40 करोड रुपयांदरम्यान असते. मात्र गायक जुबिन नौटियाल यांनी त्यांची सेकंड हँड BMW i7 नेमक्या कोणत्या किंमतीती खरेदी केली आहे, याची अचूक माहिती अद्याप मिळाली नाही.
या गाडीचे इंटीरियर एखाद्या लाउंजसारखा आरामदायक आहे. यामध्ये 31. 3 इंचाची 8k थिएटर स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये अॅमेझॉन फायर टिव्ही पाहू शकता. यासोबतच यामध्ये स्काई लाउंज पॅनोरमिक सनरूफ, बॉवर्स अँड विल्किन्स 4D साउंड सिस्टम आणि मागील दरवाज्यावर देखील टच स्क्रीन देण्यात आली आहे. डॅशबोर्डवर एक फोल्डिंग डिस्प्ले देखील आहे.
Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
बॉलीवुडमधील कलाकारांमध्ये ही गाडी प्रचंड लोकप्रिय आहे. जुबिन नौटियाल यांच्या व्यतिरिक्त अजय देवगन, जॅकलीन फर्नांडीज, शेखर सुमन आणि किम शर्मा यांच्याकडे देखील ही लग्जरी कार आहे.






