फोटो सौजन्य: X.com
कार खरेदी करताना वाहनांवरील 28 टक्के GST कमी व्हावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत होती. हीच मागणी लक्षात घेत देशाच्या पंतप्रधानांनी जीएसटीत सुधारणा होईल अशी घोषणा केली होती. यानंतर केंद्र सरकारने विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केला. यात वाहनावरील जीएसटी देखील कमी करण्यात आला. ज्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लागू होता. आता त्याच वाहनांवर आता 18 टक्के टॅक्स लागू होणार आहे.
22 सप्टेंबरपासून जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर कारच्या किमती कमी होणार आहेत. अशा परिस्थितीत सेगमेंटमधील दोन लोकप्रिय सेडान्स – Maruti Dzire आणि Tata Tigor यापैकी कोणती घ्यावी, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम वाढला आहे. जर तुम्हीही या फेस्टिव्ह सीझनमध्ये या दोन्हींपैकी एक सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जीएसटीतील बदलानंतर कोणती कार अधिक फायदेशीर ठरू शकते त्याबद्दल जाणून घेऊयात.
नवीन GST दरांच्या नावानं चांगभलं! ‘या’ 5 Compact SUV ची किंमत 1.50 लाख रुपयांनी स्वस्त
मारुतीने जीएसटी कपातीसह डिझायरची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीमधील सवलतीनंतर Maruti Suzuki Dzire ची किंमत 6,25,600 (एक्स-शोरूम) पासून सुरू होईल. ग्राहकांना व्हेरिएंटनुसार जास्तीत जास्त 87,700 पर्यंत कर सवलत मिळू शकेल.
फीचर्सकडे पाहिले तर, मारुति डिझायरमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto व Apple CarPlay सपोर्टसह), वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर AC वेंट्स आणि स्मार्ट की असे प्रीमियम फीचर्स दिले आहेत.
सुरक्षेच्या बाबतीतही डिझायरने मोठे यश मिळवले आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये तिला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. याशिवाय, यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-होल्ड असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी आधुनिक सेफ्टी फीचर्स दिली आहेत.
GST कमी झाला अन् Toyota Fortuner चा ‘हा’ व्हेरिएंट एका झटक्यात 3 लाख रुपयांनी स्वस्त झाला
टाटा मोटर्सची दुसरी सर्वाधिक परवडणारी कार टिगॉर, 22 सप्टेंबरपासून जीएसटीच्या नव्या दरांनुसार जवळपास 80,000 रुपयांनी स्वस्त होईल. सध्या याची एक्स-शोरूम किंमत 6 लाखांपासून सुरू होते.
टिगॉरच्या बेस मॉडेलमध्ये फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्ट स्टीयरिंग व्हील, नवीन फॅब्रिक सीट्स, ISOFIX, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि LED टेल लाईट्स असे फीचर्स मिळतात.
याशिवाय, टिगॉर 2025 मध्ये अपहोल्स्ट्री व ड्रायव्हर डिस्प्ले अपडेट करण्यात आले आहेत. यात एचडी रिव्हर्स कॅमेरा आणि 10.25-इंच टचस्क्रीन देखील देण्यात आली आहे.