फोटो सौजन्य: iStock
भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये Toyota Fortuner ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटी, नेते मंडळी आणि उद्योगपतींच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर हमखास दिसते. ही एसयूव्ही भल्याभल्या लक्झरी कारला सुद्धा विक्रीत मागे सोडते. अशातच केंद्र सरकारने वाहनांवरील GST कमी केला आणि अनेक वाहनांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली.
केंद्र सरकारने सणासुदीच्या आधी लोकांना जीएसटी कपातीची मोठी भेट दिली आहे. हे नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून संपूर्ण भारतात लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व कार उत्पादक कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत. टोयोटा मोटर्स देखील त्यांच्या ग्राहकांना जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा देण्यास तयार आहे.
जीएसटी कपातीनंतर, टोयोटा फॉर्च्युनरसारखे लोकप्रिय मॉडेल खरेदी करणे अनेकांसाठी सोपे झाले आहे. खरंतर, टोयोटा फॉर्च्युनरची किंमत 3.49 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्युनरच्या कोणत्या प्रकारावर किती सूट मिळणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. पूर्वी फॉर्च्युनरवर 50% (28% जीएसटी + 22% सेस) कर आकारला जात होता, जो आता जीएसटी कपातीनंतर 40% एकसमान करण्यात आला आहे.
Hero Splendor Plus की Bajaj Platina, जीएसटी कमी झाल्यानंतर कोणती बाईक जास्त स्वस्त?
Toyota Fortuner च्या 4X2 MT पेट्रोल व्हेरिएंटची किंमत आधी 36.05 लाख होती, जी कमी करून आता 33.65 लाख करण्यात आली आहे. म्हणजेच या व्हेरिएंटवर तब्बल 2.40 लाखांची सूट मिळतेय.
सर्वात जास्त सूट मात्र Fortuner GRS व्हेरिएंटवर मिळतेय. याची एक्स-शोरूम किंमत आधी 52.34 लाख होती, जी कमी करून आता 48.85 लाख करण्यात आली आहे. म्हणजेच या मॉडेलवर तब्बल 3.49 लाखांचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
Tata Motors च्या ‘या’ 3 एसयूव्ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी गेम चेंजर ठरणार, किंमत तर अगदी स्वस्त
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, “आम्ही भारत सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल आभार मानतो. GST 2.0 मुळे ग्राहकांना कार खरेदी करणे सोपे होईल आणि ऑटो उद्योगावरील विश्वासही वाढेल. या बदलामुळे सणासुदीच्या काळात मागणी आणखी वाढेल. टोयोटा नेहमीच पारदर्शक आणि कस्टमर-फर्स्ट पॉलिसीवर काम करते आणि म्हणूनच जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना दिला जाईल.