Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! चक्क Tesla Cars वर मिळतंय डिस्काउंट, कोणता मॉडेल झाला स्वस्त? जाणून घ्या

2025 मध्ये भारतात टेस्ला कारला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच आता कंपनी त्यांच्या कारवर आकर्षित डिस्काउंट देताना दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 17, 2026 | 09:06 PM
फोटो सौजन्य: istock

फोटो सौजन्य: istock

Follow Us
Close
Follow Us:
  • 15 जुलै 2025 रोजी भारतात टेस्ला मॉडेल वाय लाँच
  • मात्र, कारला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही
  • आता कंपनीने देतेय या कारवर डिस्काउंट
भारतामध्ये Tesla कार जेव्हा लाँच झाली तेव्हा नक्कीच मार्केटमध्ये तुफान येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात कंपनीची सुरुवात अपेक्षेइतकी वेगवान ठरलेली नाही. सध्या Tesla भारतात फक्त Model Y हा एकमेव मॉडेल आयात करून विक्री करत आहे. ही कार पूर्णपणे आयात (CBU) स्वरूपात येत असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात कस्टम ड्युटी आकारली जाते, परिणामी या कारची किंमत खूपच जास्त ठरते. याच कारणामुळे अनेक भारतीय ग्राहकांनी BYD आणि BMW सारख्या पर्यायी ब्रँड्सकडे आपला मोर्चा वळवला आहे. हेच ग्राहक पुन्हा मिळवण्यासाठी आता टेस्ला तिच्या कारवर डिस्काउंट देत आहे.

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

कोणत्या मॉडेलवर मिळतोय डिस्काउंट?

आता Tesla ने 2025 मधील न विकल्या गेलेल्या काही Model Y युनिट्सवर सवलत देण्यास सुरुवात केली आहे. ही सूट स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट वर देण्यात येत असून, सवलतीनंतर त्याची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही ऑफर सर्व कारसाठी लागू नसून, फक्त इन्व्हेंटरीमध्ये शिल्लक राहिलेल्या युनिट्सपुरताच मर्यादित आहे.

कमी विक्रीचे आकडे ठरले चिंतेचे कारण

डिसेंबर महिन्यात Tesla भारतात केवळ 68 युनिट्सची विक्री करू शकली, जी BYD आणि BMW सारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. संपूर्ण कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये Tesla ची एकूण विक्री 200 युनिट्सच्या थोडीशी पुढे गेली. सुरुवातीला Tesla ला चांगला प्रतिसाद आणि बुकिंग मिळाले होते, मात्र जास्त किंमतीमुळे अनेक ग्राहकांनी आपली बुकिंग रद्द केली.

जास्त किंमत आणि मर्यादित शोरूम नेटवर्क

भारतात Tesla Model Y ला BMW iX1 LWB आणि BYD Sealion 7 सारख्या इलेक्ट्रिक SUV कडून कडवी स्पर्धा मिळत आहे. या दोन्ही कार्स तुलनेने कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यातच Tesla चे एक्सपीरियन्स सेंटर्स आणि शोरूम्स सध्या मर्यादित संख्येत आहेत. मात्र कंपनी हळूहळू आपले नेटवर्क वाढवत असून, त्यामुळे येत्या काळात विक्रीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Tesla Model Y चालवून पाहिल्यानंतर बहुतांश ग्राहक तिच्या परफॉर्मन्स, प्रगत टेक्नॉलॉजी आणि ड्रायव्हिंग क्वालिटीने प्रभावित होतात. तरीही भारतीय बाजाराच्या दृष्टीने तिची किंमत जास्त असल्याचे मानले जाते, विशेषतः जेव्हा त्याच सेगमेंटमध्ये अधिक परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत.

पुढे Tesla ची रणनीती काय असू शकते?

Lamborghini India चे माजी CEO शरद अग्रवाल यांनी Tesla च्या भारतातील ऑपरेशन्सची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, कंपनीकडून रणनीतीत बदल अपेक्षित आहेत. भारतीय बाजारात यश मिळवण्यासाठी Tesla ला नवीन मॉडेल्स सादर करणे, लोकल असेंब्ली सुरू करणे किंवा किंमतीत कपात करण्यासारख्या पर्यायांवर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

 

Web Title: Tesla india is offering discount on unsold models of tesla model y

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Tesla

संबंधित बातम्या

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
1

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!
2

‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत
3

Toyota Fortuner ची धकधक वाढली! MG Motors ची ‘ही’ पॉवरफुल लवकरच होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज
4

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.