Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault Duster 2026 करण्यात आली लाँच! renault ची आयकॉनिक डस्टर

रेनोची आयकॉनिक डस्टर नव्या अवतारात भारतात पुन्हा दाखल झाली असून, Renault Duster 2026 अधिकृतपणे सादर करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 27, 2026 | 05:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात मिड-साईज SUV सेगमेंटला नवी ओळख मिळवून देणाऱ्या रेनोच्या आयकॉनिक डस्टरचे भव्य पुनरागमन झाले आहे. रेनो इंडियाने आज नवीन पिढीतील Renault Duster 2026 अधिकृतपणे सादर केली असून, आधुनिक डिझाइन, प्रगत पॉवरट्रेन, उत्कृष्ट राइड-हँडलिंग आणि उच्च दर्जाच्या सुरक्षेसह ही SUV भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही कार Renault International Game Plan 2027 अंतर्गत भारतातील पहिले उत्पादन ठरली आहे.

ही आहे खरी फायद्याची डील! जाणून घ्या देशातील सर्वात स्वस्त CNG Cars ची किंमत किती?

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या भव्य अनावरण सोहळ्यात १५ हजारांहून अधिक ऑटोप्रेमी उपस्थित होते. यामध्ये ‘Gang of Dusters’ या डस्टर मालकांच्या समुदायाचाही सहभाग होता. या कार्यक्रमातून डस्टरची लोकप्रियता आणि ब्रँडवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

नवीन रेनो डस्टरमध्ये तीन दमदार इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. Turbo TCe 160 १६३ PS पॉवर आणि २८० Nm टॉर्कसह सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली पेट्रोल इंजिन, Turbo TCe 100 किफायतशीर आणि शहरातील वापरासाठी उपयुक्त, Strong Hybrid E-Tech 160 भारतात प्रथमच १.८ लिटर इंजिन आणि १.४ kWh बॅटरीसह मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान!

हायब्रिड व्हर्जन शहरात सुमारे ८० टक्के वेळ ईव्ही मोडवर चालू शकते, ज्यामुळे इंधन बचत आणि पर्यावरणपूरक ड्रायव्हिंग शक्य होते. Turbo TCe 160 इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि वेट-क्लचसह ६-स्पीड DCT ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

ही SUV Renault Group Modular Platform (RGMP) वर आधारित असून, सुमारे ९० टक्के घटक भारतासाठी खास डिझाइन करण्यात आले आहेत. २१२ मिमी ग्राउंड क्लीअरन्स, २६.९° अॅप्रोच अँगल आणि ३४.७° डिपार्चर अँगलमुळे ही गाडी खडबडीत रस्त्यांवरही सक्षम ठरते. डस्टर ५-स्टार सुरक्षा मानकांसाठी तयार करण्यात आली असून, १७ ADAS सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

नवीन डस्टरला मस्क्युलर आणि आधुनिक लुक देण्यात आला आहे. फुल LED हेडलॅम्प्स, LED टेललॅम्प्स, आडवा LED लाईट बार आणि १८-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स गाडीचा लुक अधिक आक्रमक बनवतात. ‘Mountain Jade Green’ हा हिमालयापासून प्रेरित रंग विशेष आकर्षण ठरतो.

2 लाख रुपये भरा आणि Kia Carens Clavis घरी घेऊन जावा! जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब

आतील भाग फायटर-जेट प्रेरित ड्रायव्हर-सेंट्रिक केबिनसह येतो. भारतात प्रथमच Google Built-in OpenR Link मल्टिमीडिया सिस्टम देण्यात आली असून, गुगल मॅप्स, व्हॉइस असिस्टंट आणि प्ले स्टोअर थेट कारमध्ये उपलब्ध आहेत. पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम लेदरेट फिनिशमुळे प्रवास अधिक आरामदायी होतो. ‘Renault Forever’ कार्यक्रमांतर्गत नवीन डस्टरला ७ वर्षे किंवा १.५ लाख किमी वॉरंटी देण्यात येणार आहे. कारचे प्री-बुकिंग R Pass (₹21,000) द्वारे सुरू झाले असून, अधिकृत किंमत मार्च २०२६ मध्ये जाहीर केली जाईल. डिलिव्हरी एप्रिल २०२६ पासून, तर हायब्रिड मॉडेलची डिलिव्हरी दिवाळी २०२६ च्या सुमारास सुरू होणार आहे.

नवीन रेनो डस्टर ही आधुनिक तंत्रज्ञान, दमदार परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेचा उत्तम संगम असून, मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा रेनोची ताकद सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे.

Web Title: The renault duster 2026 has been launched renaults iconic duster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Renault

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.