फोटो सौजन्य: Gemini
Maruti S-Presso CNG ही यादीतील सर्वात स्वस्त कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 4.62 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.0L K-Series पेट्रोल-CNG इंजिन देण्यात आले असून, ते 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. या कारचे मायलेज 32.73 km/kg असून, ती आपल्या सेगमेंटमधील अत्यंत किफायतशीर पर्याय ठरते. सेफ्टी आणि फीचर्सच्या बाबतीत या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्स, ABS सोबत EBD, रिअर पार्किंग सेन्सर, ESP, 7-इंच टचस्क्रीन, Android Auto आणि Apple CarPlay यांचा समावेश आहे.
Maruti Alto K10 CNG ची किंमत 4.82 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 998cc K10C इंजिन असून, ते 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क देते. ARAI नुसार या कारचे मायलेज 33.85 km/kg इतके असून, ती ‘मायलेज क्वीन’ म्हणून ओळखली जाते. या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, रिअर सेन्सर्स आणि हिल होल्ड असिस्टसारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. 7-इंच टचस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि 214 लिटर बूट स्पेसमुळे ही कार शहरातील वापरासाठी आणि छोट्या कुटुंबांसाठी उत्तम पर्याय ठरते.
Tata Tiago CNG ची सुरुवातीची किंमत 5.49 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर रेवोट्रॉन इंजिन देण्यात आले असून, ते 72 PS पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. मॅन्युअल व्हर्जनमध्ये या कारचे मायलेज 26.49 km/kg, तर AMT व्हर्जनमध्ये 28.06 km/kg आहे. 4-स्टार GNCAP सेफ्टी रेटिंगमुळे ही कार बजेट सेगमेंटमधील सर्वाधिक सुरक्षित कार्सपैकी एक मानली जाते.
Maruti Wagon R CNG ची एक्स-शोरूम किंमत 5.89 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 998cc K10C इंजिन असून, ते 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क देते. ARAI नुसार या कारचे मायलेज 34.05 km/kg आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, ESP, रिअर सेन्सर्स आणि हिल होल्ड असिस्टसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
Maruti Celerio CNG ची किंमत 5.9a8 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 998cc K10C इंजिन देण्यात आले असून, ते 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. 34.43 km/kg मायलेजसह ही कार भारतातील सर्वाधिक इंधन-कार्यक्षम CNG कार मानली जाते. Celerio मध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, रिअर सेन्सर्स, 7-इंच टचस्क्रीन, कीलेस एंट्री आणि ऑटो AC सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. 313 लिटर बूट स्पेसमुळे कमी खर्चात जास्त मायलेज शोधणाऱ्यांसाठी ही एक परफेक्ट निवड ठरते.






