Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाईला भुरळ घालणाऱ्या रेसिंग कार्स का असतात एवढ्या खास? जाणून घ्या

रेसिंग कार्स नेहमीपासूनच तरुणांच्या आणि कार्सप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पण कधी विचार केला आहे का की अशा कोणत्या गोष्टी आहे ज्यामुळे या कार्स इतर कार्सपेक्षा वेगळ्या ठरतात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 03, 2024 | 07:00 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आजही जर एखादी रेसिंग कार रस्त्यावरून जाताना दिसली की अनेकांच्या नजरा तिच्यावर रोखल्या जातात. अनेकदा आपण टीव्हीवर कार्समधील रेसिंग पाहत असतो. या रेसिंगमध्ये अनेक जबरदस्त आणि हाय परफॉर्मन्स असणाऱ्या कार्स वापरल्या जातात. या कारचे डिझाइन लक्झरी कारलाही लाजवेल असे असते. तसेच याची पॉवर सुद्धा एवढी दमदार असते की अनेक जणांना या कार्स चालवण्याचा मोह आवरता येत नाही.

रेसिंग कार्समध्ये असे अनेक वैशिष्ट्य असतात ज्यामुळे अनेकांना या कार्स भुरळ घालतात. रेसिंग कारमध्ये हाय स्पीड, स्टेबिलिटी आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी स्पेशल मटेरिअल्स आणि इंजिनिअरिंग तंत्र वापरलेले जातात. चला जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहे जे या कारला विशेष एक खास कार बनवतात.

कार्बन फायबर बॉडी

रेसिंग कारचे मुख्य भाग कार्बन फायबरपासून बनवलेले असतात. हे मटेरियल खूप हलके असण्यासोबतच मजबूत सुद्धा असते, ज्यामुळे कारचे एकूण वजन कमी होते आणि ते अधिक वेगवान होण्यास मदत होते. हे मटेरियल हलके असल्याकारणाने कमी इंधन वापरते. तसेच कार्बन फायबर क्रॅश दरम्यान ऊर्जा शोषून सुरक्षितता देखील देते.

हे देखील वाचा: ‘ही’ आहे भारतात विकली जाणारी सर्वात महागडी बाईक, किंमत Fortuner Innova पेक्षा जास्त

एरोडायनॅमिक डिझाइन

रेसिंग कार अत्यंत एरोडायनॅमिक असण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. त्यात हवेचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी स्पॉयलर, विंग्स आणि पॅनेल्स समाविष्ट आहेत, जे कारला ट्रॅकवर स्टेबल ठेवतात. हे डिझाईन्स वाऱ्याचा प्रतिकार कमी करतात आणि कारला हाय स्पीडमध्ये स्टेबल ठेवतात.

पॉवरफुल इंजिन

रेसिंग कार्समध्ये अतिशय शक्तिशाली इंजिन बसवले जाते, ज्यांची क्षमता 1,600 CC ते 4,000 CC किंवा त्याहूनही अधिक असू शकते. ही इंजिने हजारो हॉर्स पॉवर निर्माण करतात आणि काही सेकंदात कारला 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने नेऊ शकतात. ही इंजिन विशेषतः उच्च RPM वर कार्य करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

हे देखील वाचा: Toyota Innova Crysta विकत घेण्यासाठी किती असावा पगार? जाणून घ्या किती द्यावा लागेल EMI

स्पेशल टायर्स

रेसिंग टायर्समध्ये विशेष मटेरियल आणि डिझाइन असते. हे टायर्स सामान्य टायर्सपेक्षा जास्त रुंद आणि चिकट असतात जेणेकरुन ते साधारण कार्सपेक्षा जास्त वेगाने अधिक पकड देतात. रेसिंग टायर्समध्ये उत्कृष्ट पकड आणि स्टेबिलिटी असते, ज्यामुळे कार वळणावर घसरण्याचा धोका कमी होतो.

आधुनिक ब्रेकिंग सिस्टम

रेसिंग कारमध्ये कार्बन-सिरेमिक ब्रेक वापरले जाते, जे हाय स्पीडमध्ये देखील कार लवकर थांबवू शकते. हे ब्रेकिंग सिस्टम अत्यंत तापमानातही चांगली कामगिरी करू शकतात. या ब्रेक्सच्या साहाय्याने तुम्ही हाय स्पीडमध्येही रेसिंग कारवर चांगले नियंत्रण ठेवून एक सुरक्षित राईड अनुभवू शकतात.

Web Title: These things made racing cars so special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 07:00 PM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला
1

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक
2

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत
3

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
4

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.