फोटो सौजन्य: Social Media
भारतात नेहमीपासूनच बाईक्सची क्रेज पाहायला मिळत आहे. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या आपल्या बाईककडून असणाऱ्या अपेक्षा सुद्धा बदलत आहे. पूर्वी बाईक घेताना अनेक जण फक्त मायलेजचा विचार करीत होते परंतु आज बाईकचा लूक सुद्धा महत्वाचा झाला आहे. हल्लीच्या तरुणाईला आपल्या बाईकचे लूक हटके असावा असे सतत वाटत असते. म्हणूनच ऑटो कंपनीज स्टायलिश लूक असणाऱ्या बाईक्स लाँच करत आहे.
ज्याप्रमाणे आपल्याकडे बजेट फ्रेंडली बाईक्सची चर्चा होत असते तशीच महागड्या बाईकची सुद्धा चर्चा होते. आज आपण अशाच एक बाईकबद्दल जाणून घेणार आहोत जिच्या किंमतीत एक नाही दोन फॉर्च्युनर दारात उभ्या राहतील.
हे देखील वाचा: जर कारच्या टाकीत जेट विमानाचे इंधन टाकले तर काय होईल? जाणून घेतल्यानंतर बसेल धक्का
भारतीय बाजारपेठेत अनेक ब्रँडच्या बाईक्स उपलब्ध आहेत. यामध्ये Hero, Honda, TVS, Bajaj पासून Ducati, Kawasaki आणि Triumph पर्यंत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. . अनेक ऑटो कंपनीज देशात दर महिन्याला नवीन बाईक्स लाँच करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात उपलब्ध असलेली सर्वात महागडी बाईक कोणती आहे आणि तिची किंमत काय आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.
भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या बाईकच्या किंमतीत तुम्ही 3-4 महागड्या कार एकत्र खरेदी करू शकता. या बाईकच्या किंमतीत तुम्हाला टोयोटा फॉर्च्युनर, इनोव्हा आणि कर्व्ह या कार्स खरेदी करता येतील.
Kawasaki H2R ही भारतातील सर्वात महागडी बाईक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 79.90 लाख रुपये आहे. या मोटरसायकलची ऑन रोड किंमत सुमारे 90 लाख रुपये असेल.
Kawasaki H2R च्या किंमतीत अनेक वाहने खरेदी करता येतील. भारतातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक असलेल्या Toyota Fortuner ची एक्स-शोरूम किंमत 33.43 लाख रुपयांपासून सुरू होते. तर इनोव्हा क्रिस्टाची सुरुवातीची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. भारतात अलीकडेच लाँच झालेल्या Tata Curve ची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होते. या तिन्ही कार्स कावासाकी बाईकच्या किंमतीत सहज खरेदी करता येतील.
Kawasaki H2R भारतात फक्त मिरर कोटेड मॅट स्पार्क ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 998 cc लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन 14,000 rpm वर 240 kW ची शक्ती प्रदान करते आणि 12,500 rpm वर 165 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकच्या इंजिनला 6-स्पीड ट्रान्समिशन देखील जोडलेले आहे. या बाईकमधील इंधन टाकीची क्षमता 17 लीटर आहे. ही बाईक 130 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह येते.