सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या (फोटो सौजन्य: iStock)
हल्ली इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीकडे अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर जास्त लक्षकेंद्रित करत आहे. जर तुम्ही सुद्धा सेकंड हँड इलेक्ट्रिक कार्स घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
बजेट तयार ठेवा: इलेक्ट्रिक कार असो की पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी कार. ही खरेदी करताना बजेट लक्षात ठेवले पाहिजे. सेकंड हँड कारच्या किंमतीमध्ये तिचे फीचर्स आणि इलेक्ट्रिक कारमधील बॅटरीची स्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक कारची बॅटरी: पूर्ण चार्ज झाल्यानंतर इलेक्ट्रिक कार किती रेंज देईल हे बॅटरीच्या स्थितीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, जुनी इलेक्ट्रिक कार खरेदी करताना, बॅटरीची स्थिती निश्चितपणे तपासा.
सर्व्हिस हिस्ट्री चेक करा: बऱ्याच लोकांची कार योग्य वेळी सर्व्हिसिंग होत नाही, ज्यामुळे कारची कार्यक्षमता हळूहळू खराब होऊ लागते. अशा स्थितीत तुम्ही जी कार खरेदी करणार आहात ती योग्य वेळी सर्व्हिसिंग झाली आहे की नाही याची चौकशी करून घ्या.
योग्य पद्धतीने ओनरशिप ट्रांसफर करा: तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करत असाल किंवा पेट्रोल-डिझेल वाहन, त्याची ओनरशिप कायदेशीररित्या ट्रान्स्फर करा. कारचे सर्व कागदपत्र जसे की आरसी ट्रान्सफर इत्यादी पूर्ण ट्रान्स्फर केले पाहिजेत.