फोटो सौजन्य: iStock
आपल्याकडे आजही रस्त्यावर एखादी लक्झरी कार पाहायला मिळाली की अनेक जण तिच्याकडे टक लावून पाहत असतात. आणि जर ती लक्झरी कार एका ठिकाणी पार्क केली असेल तर अनेक जण त्या कारसोबत सेल्फी किंवा फोटोज काढतात. ही गोष्ट झाली सामान्य लोकांची पण श्रीमंत लोकांना सुद्धा लक्झरी कार्सची भुरळ पडली असते. रोल्स रॉयस ही त्यातीलच लक्झरी कार उत्पादन करणाऱ्या कंपनीजपैकी एक आहे.
Rolls-Royce कार भारतात खूप लोकप्रिय होत आहेत. या ब्रँडच्या कार्सची किमती एवढ्या जास्त आहेत की त्यांची खरेदी करणे सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर आहे. सध्या केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक रोल्स रॉयस कार आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्याकडे रोल्स रॉयस ड्रॉपहेड आहे. या लक्झरी कारची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. या कारच्या किंमतीती एक-दोन नव्हे तर अनेक बंगले खरेदी करता येतील.
हे देखील वाचा: यंदाच्या दिवाळीत फक्त 1 लाखात घरी आणा Maruti Suzuki Ertiga, दरमहा भरा एवढा हप्ता
Rolls-Royce Drophead ही Phantom ची कन्व्हर्टिबल व्हर्जन आहे. ही कार खूप मोठी आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनांमध्येही ही कार एक वेगळी ओळख निर्माण करते. ही कार मोठी असल्याने ती एकदा ड्राईव्ह करायला मिळणे ही मोठी गोष्ट आहे. या कारमधील मोठे ग्रिल आणि रोल्स रॉईस मस्कट या कारला एक वेगळी ओळख देण्यासाठी पुरेसे आहेत, परंतु तिच्या बोटीसारखे डेक आणि इंटीरियरमध्ये ही कार महागड्या क्लबमध्ये समाविष्ट आहे.
Rolls-Royce Drophead च्या आतील भागात फारसे गॅझेट दिलेले नाहीत, ज्यामुळे ते फक्त साध्या पद्धतीने चालवले जाऊ शकते. या कारमध्ये V12 इंजिन बसवण्यात आले आहे. या कारच्या राइड क्वालिटीबद्दल सांगायचे तर, ही कार चालवताना ती एखाद्या बोटीसारखी तरंगत असल्याचा भास होतो. ही कार फक्त रुंद रस्त्यांवर चालवता येते. सध्या ही कार भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
हे देखील वाचा:Honda ची ‘ही’ बाईक देते लक्झरी कार्सना टक्कर, किंमत Toyota Fortuner पेक्षा जास्त
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आकाश अंबानी रोल्स रॉयस कार चालवताना दिसत आहे. कारच्या पुढील सीटवर आकाशसोबत त्यांची बहीण ईशा अंबानी बसली होती. तर आकाशची पत्नी श्लोका अंबानी कारच्या मागे बसून राइडचा आनंद घेत आहे.