फोटो सौजन्य: Social Media
देशभरात अनेक अशा बाईक उत्पादक कंपनीज आहेत जे त्यांच्या परवडणाऱ्या बाईक्समुळे ओळखल्या जातात. भारतात नेहमीपासूनच लोकांना कमी किंमतीत उत्तम बाईक्स हव्या असतात. याच अपेक्षेकडे बघता कित्येक दुचाकी उत्पादक कंपनीज बजेट फ्रेंडली बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. पण याव्यतिरिक काही बाईक्स अशा सुद्धा असतात ज्या लक्झरी कारला टक्कर देत असतात. यांची किंमत ऐकताच अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावतात. अशा बाईक्सची मार्केटमध्ये जोरदार चर्चा होत असते.
होंडा ही देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी आहे, जी तिच्या किफायती बाईक्समुळे ओळखली जाते. पण कंपनी बजेट फ्रेंडली बाईक्ससोबतच अशी एक बाईक विकते, जिची किंमत खूपच जास्त आहे. या किंमतीत नक्कीच तुम्ही तुमच्या गावी घर बांधाल.
हे देखील वाचा: इंजिन ओव्हरहीट होत असल्यास ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, अन्यथा होईल खिसा रिकामा
येथे आम्ही Honda Gold Wing Tour बद्दल बोलत आहोत, ज्याची किंमत टोयोटा फॉर्च्युनरच्या बेस मॉडेलपेक्षा जास्त आहे. चला जाणून घेऊया या होंडा बाईकमध्ये असे काय विशेष आहे ज्याने याची किंमत फॉर्च्युनरच्या बरोबरीने ठेवली आहे.
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने गेल्या वर्षी ही बाईक भारतात लाँच केली होती. त्याच्या एक्स-शोरूम किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 39 लाख 70 हजार रुपये आहे. होंडा ही बाईक CBU मार्गाने भारतात आयात आणि विकते. ही बाईक बुक करण्यासाठी तुम्हाला Honda च्या प्रीमियम बिगविंग डीलरशी संपर्क साधावा लागेल.
हे देखील वाचा: ‘या’ दिवशी येणार Royal Enfield Interceptor Bear 650, मिळणार जबरदस्त फीचर्स
गोल्ड विंग टूर बाईकमध्ये फुल एलईडी लाइटिंग सिस्टीम आणि 7-इंच फुल-कलर टीएफटी डिस्प्ले यांसारखी फीचर्स आहेत. हे अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते आणि राइडिंग, नेव्हिगेशन आणि ऑडिओ माहिती प्रदान करते.
उत्कृष्ट एयर प्रोटेक्शनसाठी एक्सटेंडेड इलेक्ट्रिक स्क्रीन, दोन यूएसबी टाइप-सी सॉकेटसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एअरबॅग्ज आणि इतर अनेक फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत. या होंडा बाईकचे वजन 390 किलो आहे, तरीही ती चालवणे खूप सोपे आहे. यामध्ये तुम्हाला 21.1 लीटरची मोठी इंधन टाकी मिळते आणि बाईकच्या सीटची उंची 745mm आहे.
गोल्ड विंग टूरमध्ये 1833cc, लिक्विड-कूल्ड, 4 स्ट्रोक, 24 वाल्व, फ्लॅट 6-सिलेंडर इंजिन वापरले जाते जे 124.7bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) शी जोडलेले आहे. यात आरामदायी क्रीप फॉरवर्ड आणि बॅक फंक्शन्स देखील समाविष्ट आहेत. यात टूर, स्पोर्ट, इकॉनॉमी आणि रेन या चार राइडिंग मोडसह टूर थ्रॉटल-बाय-वायर (TBW) सिस्टम मिळते.