Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 20 कार्सची लिस्ट! मारुती डिझायर नंबर 1, टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर

भारतीय कार मार्केटमध्ये कोणत्या कारने मारली बाजी? मारुती डिझायरने पटकावला पहिला क्रमांक, तर टाटा पंच अगदी जवळ पोहोचली! टॉप 20 मधील 9 SUV आणि मारुतीच्या 8 कार्सची विक्रीची आकडेवारी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 02, 2026 | 10:31 PM
देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 20 कार्सची लिस्ट! मारुती डिझायर नंबर 1, टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी डिझायरने 1,25,988 युनिट्स विक्रीसह आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अव्वल स्थान पटकावले.
  • टाटा पंचने 67.84% वाढ नोंदवत 1,23,287 युनिट्सच्या विक्रीसह दुसरे स्थान मिळवले.
  • टॉप 20 कार्सच्या लिस्टमध्ये 9 SUV असून मारुती सुझुकीच्या 8 कार्सनी स्थान मिळवले.
कार मार्केटमध्ये 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कोणत्या कार्सना सर्वाधिक पसंती मिळाली, याची आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत मारुती सुझुकी डिझायरने देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे टाटा पंचनेही जोरदार प्रगती करत डिझायरला कडवी टक्कर दिली आहे. टॉप 20 कार्सच्या लिस्टमध्ये SUV मॉडेल्सचे वर्चस्व दिसत असले, तरी सेडान, हॅचबॅक आणि MPV कार्सनीही चांगली विक्री नोंदवली आहे.

मारुती डिझायर नंबर 1, टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर

मारुती सुझुकी डिझायरने एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान 1,25,988 युनिट्सची विक्री केली. मागच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत 1,08,006 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच डिझायरच्या विक्रीत 16.65% वाढ झाली आहे. दुसरीकडे, टाटा पंचने 1,23,287 युनिट्सची विक्री करत दुसरे स्थान मिळवले. या दोन्ही कार्समधील फरक फक्त 2,701 युनिट्सचा आहे. पंचच्या विक्रीत तब्बल 67.84% वाढ झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी वॅगनआर असून तिची 1,16,029 युनिट्सची विक्री झाली. मारुती एर्टिगाने 1,12,557 युनिट्ससह चौथे स्थान मिळवले. तर टाटा नेक्सॉन 1,11,919 युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या क्रमांकावर आहे. या सर्व मॉडेल्सनी 1 लाख युनिट्सचा टप्पा पार केला आहे.

पुढील 2 महिन्यांत 7 नवीन कार्सचे लाँच! मर्सिडीज, टोयोटा, डेंझा आणि ह्युंदाईच्या गाड्यांची उत्सुकता

टॉप 20 मध्ये SUV कार्सचे वर्चस्व

या लिस्टमध्ये एकूण 9 SUV मॉडेल्सनी स्थान मिळवले आहे. टाटा नेक्सॉन पाचव्या, मारुती फ्रॉन्क्स सहाव्या आणि महिंद्रा स्कॉर्पिओ नवव्या क्रमांकावर आहे. ह्युंदाई क्रेटाने दहावे, मारुती ब्रेझाने अकरावे आणि ह्युंदाई व्हेन्यूने चौदावे स्थान मिळवले आहे. किआ सेल्टोस, किआ सोनेट, महिंद्रा XUV 7XO आणि XUV 3XO यांनीही टॉप 20 मध्ये स्थान मिळवले.

मारुती सुझुकीच्या एकूण 8 कार्सनी टॉप 16 मध्ये स्थान मिळवले आहे. फ्रॉन्क्सच्या विक्रीत 43.40%, स्विफ्टमध्ये 29.97% आणि बलेनोमध्ये 50.81% वाढ झाली आहे. मारुती इकोने 73,454 युनिट्स, तर अल्टोने 62,381 युनिट्सची विक्री नोंदवली.

मारुती व्हिक्टोरिस आणि किआ सेल्टोसची मोठी झेप

विक्रीच्या टक्केवारीतील वाढ पाहिली तर मारुती सुझुकी व्हिक्टोरिसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या SUV च्या 72,012 युनिट्सची विक्री झाली असून तिच्या विक्रीत 1,581.74% वाढ नोंदवण्यात आली. किआ सेल्टोसनेही 67,667 युनिट्सची विक्री करत 99.28% वाढ मिळवली आहे. मारुती अल्टोच्या विक्रीत 92.03% वाढ झाली आहे.

दुसरीकडे, टॉप 20 मधील फक्त ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ब्रेझाच्या विक्रीत घट झाली. क्रेटाच्या विक्रीत 9.68% घट होऊन 89,727 युनिट्सची विक्री झाली. तर ब्रेझाच्या विक्रीत 5.17% घट होऊन 80,516 युनिट्सची नोंद झाली.

महिंद्रा XUV 7XO, XUV 3XO आणि बोलेरो यांनी अनुक्रमे 53,081, 52,851 आणि 51,720 युनिट्सची विक्री केली. एकंदरीत, भारतीय कस्टमर्सचा SUV कडे वाढणारा कल या आकडेवारीतून दिसतो. पण डिझायर, वॅगनआर आणि एर्टिगासारख्या कार्सची लोकप्रियताही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नॉर्टनची नवीन 450cc बाईक येतेय! 8-इंच टचस्क्रीन, 45 Nm टॉर्कसह 2027 मध्ये विक्री सुरू! लवकरच होणार लाँच

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: 2026-27 च्या पहिल्या सहामाहीत भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार कोणती?

उत्तर: मारुती सुझुकी डिझायर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली. एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान तिची 1,25,988 युनिट्स विकली गेली.

प्रश्न 2: टाटा पंचची H1 FY27 मध्ये किती विक्री झाली?

उत्तर: टाटा पंचच्या 1,23,287 युनिट्सची विक्री झाली. मागच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत तिच्या विक्रीत 67.84% वाढ झाली.

प्रश्न 3: टॉप 20 कार्सच्या लिस्टमध्ये सर्वाधिक कार्स कोणत्या कंपनीच्या आहेत?

उत्तर: मारुती सुझुकीच्या सर्वाधिक 8 कार्सनी टॉप 16 मध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये डिझायर, वॅगनआर, एर्टिगा, फ्रॉन्क्स, स्विफ्ट, बलेनो, इको आणि व्हिक्टोरिस यांचा समावेश आहे.

Web Title: Top 20 best selling cars india h1 fy27 maruti dzire tata punch auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:31 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Hyundai
  • Maruti
  • Tata

संबंधित बातम्या

पुढील 2 महिन्यांत 7 नवीन कार्सचे लाँच! मर्सिडीज, टोयोटा, डेंझा आणि ह्युंदाईच्या गाड्यांची उत्सुकता
1

पुढील 2 महिन्यांत 7 नवीन कार्सचे लाँच! मर्सिडीज, टोयोटा, डेंझा आणि ह्युंदाईच्या गाड्यांची उत्सुकता

नॉर्टनची नवीन 450cc बाईक येतेय! 8-इंच टचस्क्रीन, 45 Nm टॉर्कसह 2027 मध्ये विक्री सुरू! लवकरच होणार लाँच
2

नॉर्टनची नवीन 450cc बाईक येतेय! 8-इंच टचस्क्रीन, 45 Nm टॉर्कसह 2027 मध्ये विक्री सुरू! लवकरच होणार लाँच

टीव्हीएसची ऑक्टोबरमध्ये 7 लाख वाहनांची विक्री! इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 120% वाढ
3

टीव्हीएसची ऑक्टोबरमध्ये 7 लाख वाहनांची विक्री! इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 120% वाढ

रॉयल एनफिल्डची फेस्टिव्हल सेलमध्ये ऐतिहासिक विक्री! ऑक्टोबरमध्ये 1.33 लाख बाइक्सची विक्री
4

रॉयल एनफिल्डची फेस्टिव्हल सेलमध्ये ऐतिहासिक विक्री! ऑक्टोबरमध्ये 1.33 लाख बाइक्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.