फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक अत्याधुनिक कार्स लाँच होताना दिसत आहे. या कार्स ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत असतात. नुकतेच जपानी कार उत्पादक कंपनीने आज भारतीय बाजारात आपली लोकप्रिय Toyota Camry च्या नवीन जनरेशन मॉडेलला विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या कारमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या नवीन कारला ग्लोबल मार्केटमध्ये एक वर्षाआधीच लाँच केले होते. आता ही कार भारतीय बाजारात लाँच झाली आहे. या आधुनिक कारमध्ये कंपनीने लेटेस्ट जनरेशन हायब्रीड तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
Hyundai कंपनीची मोठी घोषणा; भारतात उभारणार तब्बल 600 EV चार्जिंग स्टेशन्स
नवीन Toyota Camry मध्ये कंपनीने 2.5 लीटर पेट्रोल इंजिन पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे. मात्र, यावेळी त्याची हायब्रीड सिस्टम अपडेट करण्यात आली आहे. यावेळी यात टोयोटाची 5th जनरेशन हायब्रिड सिस्टीम असेल. या बदलामुळे कारची एकत्रित शक्ती 4 टक्क्यांनी वाढली आहे.
नवीन टोयोटा कॅमरीमध्ये आता जास्तीत जास्त 230hp पॉवर असेल. मागील जनरेशनच्या टोयोटा कॅमरीच्या पॉवरपेक्षा हे 12hp अधिक उत्पादन आहे. एवढेच नाही तर नवीन हायब्रीड सिस्टममुळे कारचे मायलेजही पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. कंपनीने यामध्ये eCVT गिअरबॉक्स वापरला आहे.
जर आपण टोयोटा कॅमरीच्या फिचर्स बोलायचे झाले तर कंपनीने ते TNGA-K प्लॅटफॉर्मवर विकसित केले आहे. यामुळे कारची स्टेबिलिटी सुधारली आहे आणि तिचे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स देखील आरामदायक झाले आहेत. कंपनीने ड्रायव्हिंग सीटची स्थिती देखील अपडेट केली आहे. या कारमध्ये तुम्हाला एलईडी हेडलॅम्प, U-shaped DRL, अरुंद ग्रिल आणि त्यावर टोयोटाचा ‘T’ लोगो देण्यात आला आहे.
ही कार सी-आकाराच्या टेल लाइट आणि 18 इंच अलॉय व्हीलसह येईल. कंपनीने यामध्ये 7 इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्क्रीन दिली आहे. 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, JBL चे 9-स्पीकर आणि 10-इंच हेड-अप डिस्प्ले देखील प्रदान केले आहेत.
कार खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Mahindra च्या ‘या’ कारवर तब्बल 3 लाखांची सवलत
भारतात येणाऱ्या नवीन टोयोटा कॅमरीमध्ये ग्राहकांना ADAS सूट देखील मिळेल. यामुळे कारची सुरक्षा सुधारते. हे अनेक कनेक्ट केलेल्या फीचर्सची सुविधा देखील प्रदान करते. सुरक्षेसाठी या कारमध्ये 9 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. तसेच, ADAS मुळे, यात प्री-कॉलिजन सिस्टीम, पादचारी शोध, रडार-आधारित क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि रोड साइन असिस्ट यांसारखी फीचर्स मिळतात. या कारमध्ये पार्किंग सेन्सर आणि 360-डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
टोयोटा कॅमरीची भारतात एक्स-शोरूम किंमत 48 लाख रुपये असणार आहे. 8व्या जनरेशनच्या Toyota Camry पेक्षा ते 1.83 लाख रुपये जास्त महाग आहे. परंतु, बाजारात तिची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी कार स्कोडा सुपर्ब आहे, ती सुमारे 6 लाख रुपयांनी स्वस्त आहे.