
फोटो सौजन्य: Pinterest
एमजी मोटर इंडिया त्यांच्या एसयूव्ही पोर्टफोलिओमध्ये एक नवीन आणि मोठे नाव जोडण्यासाठी सज्ज आहे. कंपनी येत्या 12 फेब्रुवारी रोजी भारतात 2026 MG Majestor भारतात लाँच करणार आहे. ही एमजीची नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही असेल, जी MG Gloster च्या वर पोजिशन केली असेल.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, मॅजेस्टर आणि ग्लोस्टर दोन्ही एकत्र विकले जाऊ शकतात. मॅजेस्टरमध्ये तीन-रो सीटिंग, ग्लोस्टर प्रमाणेच पॉवरट्रेन सेटअप आणि फीचर्सचे कॉम्प्लिमेंटरी पॅकेज असण्याची अपेक्षा आहे. मात्र, ती ग्लोस्टरपेक्षा अधिक प्रीमियम आणि शक्तिशाली फॉर्म फॅक्टरमध्ये देऊ शकते. चला या एसयूव्हीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज
Majestor चे फ्रंट डिझाइन अत्यंत दमदार दिसते. यात रुंद ग्लॉस-ब्लॅक ग्रिल, उभ्या पद्धतीने बसवलेले LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, वरच्या बाजूला LED DRLs आणि फ्रंट बंपरमध्ये ठळक सिल्व्हर-फिनिश स्किड प्लेटसह वर्टिकल डिटेलिंग देण्यात आली आहे.
साइड प्रोफाइलकडून पाहिल्यास Majestor चा स्टान्स मोठा आणि मस्क्युलर जाणवतो. यात 19-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, खाली जाड ब्लॅक बॉडी क्लॅडिंग, कॉन्ट्रास्टसाठी ब्लॅक्ड-आउट डोअर हँडल्स, रूफ रेल्स आणि ब्लॅक विंडो पिलर्स देण्यात आले आहेत.
मागील बाजूस Majestor मध्ये हॉरिजॉन्टल LED टेललॅम्प्स देण्यात आले असून ते लाइट बारद्वारे एकमेकांना जोडलेले असतील. रियर बंपरमध्येही फ्रंटसारखाच टच देण्यात आला असून सिल्व्हर-फिनिश स्किड प्लेट आणि स्पष्ट दिसणारे ड्युअल एग्झॉस्ट आउटलेट्स लक्ष वेधून घेतात. एकूणच डिझाइनच्या बाबतीत Majestor ला अधिक फ्रेश, प्रीमियम आणि हाय-एंड SUV अपील देण्यात आले आहे.
600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक
इंटीरियर आणि फीचर्सबाबत स्पाय शॉट्सनुसार MG Majestor चे केबिन Gloster पेक्षा अधिक प्रीमियम आणि टेक-ओरिएंटेड असण्याची शक्यता आहे. यात लेयर्ड डिझाइन असलेला डॅशबोर्ड मिळू शकतो. तसेच, इंफोटेनमेंटसाठी एक आणि ड्रायव्हर डिस्प्लेसाठी एक असा ड्युअल डिजिटल स्क्रीन सेटअप देण्यात येईल. ही SUV थ्री-रो केबिनसह येणार असून 6-सीटर आणि 7-सीटर लेआउटचे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबांसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी Majestor एक मजबूत आणि आकर्षक पर्याय ठरू शकते.
एमजी मॅजेस्टरची सुरुवातीची किंमत सुमारे 46 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून असण्याची अपेक्षा आहे. ही एसयूव्ही थेट Toyota Fortuner, Toyota Fortuner Legender, Skoda Kodiaq शी स्पर्धा करेल.