Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या सप्टेंबरमध्ये टोयोटाने विकल्या 28,218 कार! 9 महिन्यांच्या विक्रीत 8% वाढ

टोयोटाने सप्टेंबरमध्ये 28,218 वाहनांची विक्री केली असून जानेवारी-सप्टेंबरची एकूण विक्री 2,94,914 युनिट्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कंपनी आता 2026 मध्ये 3 लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 02, 2026 | 04:03 PM
या सप्टेंबरमध्ये टोयोटाने विकल्या 28,218 कार! 9 महिन्यांच्या विक्रीत 8% वाढ
Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबरमध्ये टोयोटाने भारतात 25,027 आणि परदेशात 3,191 वाहनांची विक्री केली.
  • जानेवारी-सप्टेंबर 2026 दरम्यान टोयोटाच्या एकूण विक्रीत 8% वार्षिक वाढ नोंदवली.
  • टोयोटाची 9 महिन्यांची विक्री आता 3 लाख वाहनांच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या जवळ पोहोचली आहे.
Toyota Kirloskar Motorने सप्टेंबर 2026 मध्ये एकूण 28,218 वाहनांची विक्री नोंदवली आहे. यामध्ये भारतातील 25,027 युनिट्स आणि 3,191 एक्सपोर्ट युनिट्सचा समावेश आहे. कंपनीसाठी यंदाच्या पहिल्या 9 महिन्यांतील कामगिरीही महत्त्वाची ठरली असून जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान एकूण सेल 2,94,914 युनिट्सवर पोहोचली आहे.

देशातील विक्रीचाही मोठा वाटा

टोयोटाच्या यंदाच्या एकूण विक्रीवाढीमध्ये देशांतर्गत मार्केटचा मोठा वाटा राहिला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान कंपनीने भारतात 2,69,619 वाहनांची विक्री केली. मागच्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 2,47,081 युनिट्स होता. म्हणजेच देशांतर्गत विक्रीत 9% वाढ झाली आहे. दुसरीकडे, 9 महिन्यांत 25,295 वाहनांचा एक्सपोर्ट करण्यात आला, जो मागच्या वर्षीच्या 25,743 युनिट्सपेक्षा 2% कमी आहे.

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा

SUV आणि MPV मॉडेल्सवर फोकस

टोयोटाच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये SUV आणि MPV मॉडेल्सना मोठे महत्त्व आहे. इनोव्हा हायक्रॉस, इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर आणि लिजेंडरचे भारतात प्रोडक्शन केले जाते. कॅमरी हायब्रिड, अर्बन क्रूझर हायरायडर आणि हिलक्स यांचाही कंपनीच्या लाइनअपमध्ये समावेश आहे. याशिवाय ग्लान्झा, रुमियन आणि अर्बन क्रूझर टायसर हे मॉडेल्सही कस्टमर्ससाठी अव्हेलेबल आहेत.

नवीन अपडेट्समुळे विक्रीला मिळणार बूस्ट?

टोयोटाच्या पोर्टफोलिओमध्ये लवकरच काही महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळू शकतात. ग्लान्झा फेसलिफ्ट ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे, तर इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट 2027च्या सुरुवातीला येऊ शकते. हायक्रॉसच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये सध्याचे पेट्रोल आणि स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन कायम राहण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये निसानच्या गाड्यांची विक्री दुप्पट! रेनॉल्टच्या 3,399 युनिट्सची विक्री

3 लाखांचा टप्पा गाठण्याच्या जवळ

टोयोटाच्या बिदाडी, कर्नाटक येथे 2 प्रोडक्शन प्लांट आहेत. दोन्ही प्लांटची एकत्रित वार्षिक प्रोडक्शन कॅपसिटी 3.42 लाख युनिट्सपर्यंत आहे. जानेवारी-सप्टेंबरमध्ये जवळपास 2.95 लाख वाहनांची विक्री झाल्याने कंपनी 2026 मध्ये 3 लाख युनिट्सच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. आता वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यांत टोयोटाची विक्री हा टप्पा पार करते का, याकडे ऑटो मार्केटचे लक्ष असेल.

Web Title: Toyota india september sales 2026 growth nears three lakh auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.