(फोटो सौजन्य-AI एआय)
ऑगस्टच्या तुलनेतही विक्री वाढली
कियाच्या धडाकेदार कामगिरीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे सप्टेंबरमध्ये कंपनीची विक्री केवळ वार्षिक आधारावरच नाही, तर महिन्याच्या तुलनेतही वाढली. ऑगस्ट 2026 मध्ये कियाने 29,042 युनिट्सची विक्री केली होती. त्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 10.2% वाढ नोंदवण्यात आली. म्हणजेच एका महिन्यात कंपनीने जवळपास 3,000 जास्त वाहनांची विक्री केली.
सेल्टोस आणि सोनेट ठरले महत्त्वाचे मॉडेल्स
कियाच्या एकूण विक्रीमध्ये सेल्टोस आणि सोनेटचा मोठा वाटा आहे. जानेवारीमध्ये लाँच झाल्यापासून सेल्टोसची सरासरी मासिक विक्री 10,000 युनिट्सपेक्षा जास्त राहिली आहे. दुसरीकडे सोनेट सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या दोन्ही SUVमुळे कियाला भारतीय मार्केटमध्ये मजबूत व्हॉल्यूम मिळत आहे.
9 महिन्यांत 2.53 लाखांहून जास्त वाहनांची विक्री
जुलै ते सप्टेंबर 2026 या Q3 कालावधीत कियाने 89,259 युनिट्सची विक्री केली. मागच्या वर्षी याच कालावधीत 64,443 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. तसेच जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान कंपनीची एकूण विक्री 2,53,008 युनिट्सवर पोहोचली असून, मागच्या वर्षीच्या 2,06,582 युनिट्सच्या तुलनेत 22.5% वाढ झाली आहे.
CNG, EV आणि हायब्रिडवरही फोकस
किया आपल्या मॉडेल लाइनअपमध्ये सातत्याने नवीन ऑप्शन जोडत आहे. कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस EVसोबत आता कॅरेन्स CNG आणि कॅरेन्स क्लॅव्हिस CNG देखील अव्हेलेबल आहेत. सायरोस EVलाही मागणी मिळत आहे. पेट्रोल, डिझेल, CNG, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक अशा वेगवेगळ्या पॉवरट्रेनसह किया आपले पोर्टफोलिओ मोठा करत आहे.
सोरेन्टोमुळे प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये विस्तार
नुकत्याच लाँच झालेल्या सोरेन्टोला देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतात ही SUV डिझेल आणि हायब्रिड पॉवरट्रेनसह येते. त्यामुळे किआचा प्रीमियम SUV सेगमेंटमधील सहभाग आणखी मजबूत झाला आहे. सप्टेंबरची 32,017 युनिट्सची विक्री आता कंपनीसाठी नवीन मासिक सेल्स बेंचमार्क ठरली आहे.






