
ट्रायम्फच्या 400cc पोर्टफोलिओमध्ये नवी भर
बोनेव्हिल 400 ही ट्रायम्फच्या 400cc कुटुंबातील 7वी मोटरसायकल ठरणार आहे. स्पीड टी4, स्पीड 400, स्क्रॅम्बलर 400X, स्क्रॅम्बलर 400 XC, थ्रक्स्टन 400 आणि ट्रॅकर 400नंतर कंपनीकडून हे नवीन मॉडेल आणले जात आहे. या बाईकसाठी नवीन चेसिस, स्विंगआर्म आणि रिअर सबफ्रेम तयार करण्यात आले आहेत. फ्लॅट बेंच-टाइप सीटमुळे तिचा मागचा भाग इतर 400cc मॉडेलपेक्षा वेगळा दिसतो.
रेट्रो डिझाइनला क्रोमचा टच
बोनेव्हिल 400च्या डिझाइनमध्ये मोठ्या 900cc आणि 1200cc बोनेव्हिल मॉडेल्सची स्पष्ट झलक पाहायला मिळते. मोठा फ्युल टँक, गोलाकार साइड पॅनेल्स, जाड फेंडर्स आणि वायर-स्पोक व्हील्समुळे बाईकला खास क्लासिक लूक मिळतो. पीशूटर एक्झॉस्ट, इंजिन क्रॅंककेस कव्हर्स आणि रिअर ग्रॅब रेल्सवरील क्रोम फिनिश तिचा रेट्रो लूक आणखी उठावदार करते.
आधुनिक फीचर्सपेक्षा क्लासिक सेटअपवर भर
बाईकमध्ये गोलाकार एलईडी हेडलॅम्प, टिअरड्रॉप आकाराचा फ्युल टँक आणि लोअर हँडलबार देण्यात आला आहे. स्पीड 400च्या यूएसडी फोर्क्सऐवजी बोनेव्हिल 400मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागे ट्विन-शॉक सस्पेन्शन मिळणार आहे. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेकसोबत ड्युअल-चॅनेल एबीएसही मिळेल.
349cc इंजिनची ताकद
भारतासाठी बोनेव्हिल 400मध्ये 349cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 36.5 bhp पॉवर आणि 32 Nm टॉर्क तयार करते. त्यामुळे क्लासिक लूकसोबत दमदार कामगिरीचे कॉम्बिनेशन ग्राहकांना मिळू शकते. लॉन्चची अधिकृत तारीख आणि किंमत समोर आल्यानंतर या नव्या ट्रायम्फची स्पर्धा आणखी स्पष्ट होईल.