
Four Popular 125cc Sporty Bikes Compared (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय Two-Wheeler Market मध्ये 125cc Sporty Bikes ची लोकप्रियता वाढत आहे. या सेगमेंटमध्ये टीव्हीएस, हिरो, बजाज आणि होंडा यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. टीव्हीएसने EICMA 2026 मध्ये नवीन अपाचे आरटीआर 125 एलसी सादर केली आहे. त्यामुळे हिरो एक्स्ट्रीम 125आर, बजाज पल्सर 125 आणि होंडा सीबी125 हॉर्नेट या बाईक्ससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. फीचर्स, इंजिन आणि रंगांच्या बाबतीत या चारही बाईक्समध्ये काय फरक आहे, जाणून घेऊया.
रंगांचे ऑप्शन कसे आहेत?
टीव्हीएस अपाचे आरटीआर 125 एलसीला EICMA 2026 मध्ये लाइम ग्रीन आणि ग्रे असे ड्युअल-टोन रंगात दाखवण्यात आले. इतर रंगांची माहिती कंपनीने दिलेली नाही. हिरो एक्स्ट्रीम 125आर स्टेल्थ एडिशन मिडनाइट ब्लॅक आणि पर्ल रेड अॅक्सेंटमध्ये मिळते. होंडा सीबी125 हॉर्नेटमध्ये 3 ड्युअल-टोन आणि 1 सिंगल-टोन रंगाचे ऑप्शन आहेत. तर बजाज पल्सर 125 मध्ये 5 ड्युअल-टोन रंग दिले आहेत.
फीचर्समध्ये कोण पुढे?
टीव्हीएस अपाचे आरटीआर 125 एलसीमध्ये 5-इंच TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मॅप मिररिंग, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ड्युअल-चॅनल एबीएस आणि इमर्जन्सी ब्रेक लाईट मिळते. हिरो एक्स्ट्रीम 125आरमध्ये 4.2-इंच TFT डिस्प्ले, नेव्हिगेशन, कॉल-मॅसेज अलर्ट, म्युझिक कंट्रोल, TPMS आणि क्रूझ कंट्रोल आहे. यामध्ये रेन, रोड आणि स्पोर्ट असे 3 रायडिंग मोड्सही मिळतात.
बजाज पल्सर 125 मध्ये TFT डिस्प्ले, गुगल मॅप्स मिररिंग, कनेक्टेड टेक्नोलॉजी, कॉल-मॅसेज अलर्ट आणि 3 रायडिंग मोड्स दिले आहेत. होंडा सीबी125 हॉर्नेटमध्ये 4.2-इंच TFT डिस्प्ले, USB Type-C चार्जिंग पोर्ट, सिंगल-चॅनल एबीएस आणि गोल्डन USD फ्रंट सस्पेंशन मिळते.
Honda Rebel 300 च्या डिलिव्हरी भारतात सुरू! 27.6 PS पॉवर, E-Clutch व्हेरिएंटसाठी ₹40,000 जास्त
इंजिनमध्ये अपाचे सर्वात पुढे!
इंजिनच्या बाबतीत टीव्हीएस अपाचे आरटीआर 125 एलसी सर्वात पुढे आहे. यात 125cc लिक्विड-कूल्ड इंजिन असून ते 14.7 bhp पॉवर आणि 12 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर-असिस्ट क्लच मिळतो.
हिरो एक्स्ट्रीम 125आरमध्ये 125cc इंजिन असून ते 11.4 bhp पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क देते. बजाज पल्सर 125 मध्ये 124.58cc इंजिन असून 11.8 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क मिळतो. तर होंडा सीबी125 हॉर्नेटमध्ये 123.94cc इंजिन 11 bhp पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क देते. या तिन्ही बाईक्समध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. त्यामुळे पॉवरच्या बाबतीत टीव्हीएस अपाचे आरटीआर 125 एलसी आघाडीवर दिसते.
Ans: टीव्हीएस अपाचे आरटीआर 125 एलसीमध्ये 125cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 14.7 bhp पॉवर आणि 7,000 rpm वर 12 Nm टॉर्क देते.
Ans: टीव्हीएस अपाचे आरटीआर 125 एलसी सर्वाधिक 14.7 bhp पॉवर देते. त्यानंतर बजाज पल्सर 125 मध्ये 11.8 bhp, हिरो एक्स्ट्रीम 125आरमध्ये 11.4 bhp आणि होंडा सीबी125 हॉर्नेटमध्ये 11 bhp पॉवर मिळते.
Ans: हिरो एक्स्ट्रीम 125आरमध्ये 4.2-इंच TFT डिस्प्ले, TPMS, क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि रेन, रोड व स्पोर्ट असे 3 रायडिंग मोड्स मिळतात.