फोटो सौजन्य: X.com
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटला अच्छे दिन येत आहे. अनेक वाहन खरेदीदार इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळेच देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्यांनी उत्तमोत्तम इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये चांगल्या स्कूटर ऑफर केल्या आहेत. अशीच एक स्कूटर म्हणजे TVS iQube.
भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टर नवीन उंची गाठत आहे आणि याच दिशेने, टीव्हीएस मोटर कंपनीने Noise सोबत एक अनोखे पाऊल उचलले आहे. दोन्ही कंपन्यांनी देशातील पहिले ईव्ही स्मार्टवॉच इंटिग्रेशन सादर केले आहे, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या स्कूटरशी रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी मिळते. हे नवोपक्रम टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पेशल एडिशन Noise स्मार्टवॉचला जोडते, ज्यामुळे रायडर्सना बॅटरीची कंडिशन, टायर प्रेशर आणि सुरक्षा सूचना यासारखी महत्त्वाची माहिती लगेच मिळते.
1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का! बाईकचे बिल व्हायरल
भारतीय बाजारपेठेत TVS आयक्यूबने 6.5 लाखांहून अधिक युनिट्स विकण्याचा एक नवीन टप्पा आधीच गाठला आहे. नॉईजसोबतच्या या भागीदारीमुळे त्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. हे स्मार्टवॉच केवळ एक स्टायलिश गॅझेट नाही तर आता ते गतिशीलतेचा साथीदार बनेल, ज्यामुळे दररोजच्या प्रवास अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सोपा होईल. या स्कूटरची सुरवातीची किंमत 96,422 पासून होते.
TVS iQube Noise स्मार्टवॉच फक्त TVS iQube च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि याची सुरुवातीची किंमत फक्त 2,999 रुपये ठेवली आहे. या स्मार्टवॉचसोबत ग्राहकांना 12 महिन्यांची Noise Gold सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. हा उपक्रम भारतीय EV उद्योगासाठी मोठा बदल ठरू शकतो, कारण आता स्मार्टवॉच केवळ लाइफस्टाइल डिव्हाइस राहिला नसून तो एक खऱ्या अर्थाने स्मार्ट रायडिंग असिस्टंट बनली आहे.
रोजच्या प्रवासासाठी ‘या’ 5 बाईक्स आहेत बेस्ट, GST कमी झाल्यानंतर तर अजूनच झाल्या स्वस्त
TVS iQube तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे, स्टँडर्ड, S आणि ST. यात 2.2 kWh, 3.1 kWh, 3.5 kWh आणि 5.5 kWh असे चार बॅटरी पर्याय आहेत. 2.2 kWh आणि 3.1 kWh बॅटरी पॅक असलेल्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटमध्ये 4 kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या व्हेरिएंटची जास्तीतजास्त स्पीड 75 किमी/तास असून सिंगल चार्ज रेंज देखील 75 किमी इतकी आहे.