फोटो सौजन्य: @HyundaiUAE (X.com)
आजही कार खरेदी करताना ग्राहक उत्तम सेफ्टी, फीचर्स आणि मायलेज व्यतिरिक्त अजून एका गोष्टीवर फोकस करतो तो म्हणजे कारच्या किमतीवर मिळणार डिस्काउंट. जर तुम्ही सुद्धा अशा एका कारच्या शोधात आहेत जिच्यावर दमदार डिस्काउंट मिळत आहे, तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या एका कारवर मन भरून डिस्काउंट देत आहे.
ह्युंदाई इंडियाने ऑगस्ट 2025 साठी त्यांच्या कारवरील डिस्काउंट जाहीर केल्या आहेत. कंपनी या महिन्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने Hyundai Venue वर फेस्टिव्ह डिस्काउंट देखील देत आहे. ही सवलत डीलर्सकडून दिली जात आहे. जर तुम्ही या महिन्यात ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी केली तर तुम्हाला 85,000 रुपयांची सूट मिळेल. कंपनी गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये या कारवर अशीच सूट देत होती. तिच्या एक्स-शोरूम किमती 7.94 लाख रुपयांपासून ते 13.53 लाख रुपयांपर्यंत आहेत.
या कारमध्ये मल्टी इंजिन पर्याय आहेत. जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहेत.
त्याच्या 1.2-लिटर पेट्रोल मॅन्युअलचा मायलेज 17.52 किमी/लीटर आहे, 1.0-लिटर टर्बो पेट्रोल IMT चा मायलेज 18.07 किमी/लीटर आहे, 1.0-लिटर टर्बो पेट्रोल DCT (ऑटोमॅटिक) चा मायलेज 18.31 किमी/लीटर आहे आणि 1.5-लिटर डिझेल मॅन्युअलचा मायलेज 23.4 किमी/लीटर आहे.
यात स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी डीआरएलएस, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली आहे. रायडर्सच्या सुरक्षेसाठी, 6 एअरबॅग्ज, टीपीएमएस हायलाइन, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी) आणि रिअर कॅमेरा यांसारखी फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील.
आता बास झाली पेट्रोलची कटकट ! फक्त 8 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ Tata EV
या एसयूव्हीमध्ये कलरफुल टीएफटी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्लेसह डिजिटल क्लस्टर देखील आहे, जे अचूक आणि सुलभ माहितीसह ड्रायव्हिंग अनुभव वाढवते. त्याच्या सेगमेंटमध्ये, व्हेन्यू किआ सोनेट, मारुती ब्रेझा, स्कोडा कोडियाक, महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ सारख्या मॉडेल्सशी थेट स्पर्धा करते.