Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report

रेनॉल्ट कंपनीसाठी डिसेंबर 2025 चा महिना खास ठरला आहे. याचे कारण म्हणजे या काळात कंपनीच्या विक्रीत 33.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 03, 2026 | 06:51 PM
Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report

Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report

Follow Us
Close
Follow Us:
  • रेनॉल्ट ही भारतातील आघाडीची ऑटो कंपनी
  • डिसेंबर 2025 मध्ये झाली दमदार विक्री
  • डिसेंबरच्या विक्रीत 33.4 टक्क्यांची वाढ
Renault India ने CY2025 च्या दुसऱ्या सहामाहीत (H2) उत्तम कामगिरी नोंदवली असून, विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीने H2 CY2025 मध्ये वर्षभरात 18.2 टक्के वाढ नोंदवली, तर Q4 मध्ये विक्री 27.3 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे भारतीय बाजारात Renault च्या पुनरागमनाला स्पष्ट गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

डिसेंबर 2025 हा महिना Renault India साठी विशेष ठरला. या महिन्यात कंपनीने 3,845 युनिट्सची विक्री केली असून, डिसेंबर 2024 च्या तुलनेत ही वाढ तब्बल 33.4 टक्के आहे. Q3 पासून सुरू झालेला सकारात्मक ट्रेंड Q4 मध्ये अधिक मजबूत झाला, विशेषतः नवीन आणि अपडेटेड मॉडेल्स ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतर.

अरे बाईक आहे की लक्झरी कार? किंमत इतकी जास्त की दारात दोन Fortuner उभ्या राहतील!

Renault Group India चे CEO स्टेफान डेब्लेझ (Stephane Deblaise) यांनी सांगितले की, “CY2025 च्या दुसऱ्या सहामाहीतील कामगिरी ही भारतातील Renault साठी आम्ही ठरवलेल्या दिशेची साक्ष आहे. पोर्टफोलिओ ट्रान्झिशननंतर Q3 पासून सातत्याने सुधारणा दिसून आली आणि Q4 तसेच डिसेंबरमधील सर्वोत्तम मासिक विक्रीने आमच्या धोरणात्मक बदलांचे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत. आता योग्य पायाभूत घटक तयार झाले असून, भारतातील Renault च्या नव्या प्रवासात आयकॉनिक Duster चे कमबॅक एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”

2025 दरम्यान Renault India ने अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये नवीन ‘R’ स्टोअर्सची सुरुवात करून रिटेल अनुभव मजबूत करणे, भारतात Renault Design Centre ची स्थापना करून स्थानिक गरजांनुसार उत्पादन विकासावर भर देणे, ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी 3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी देणे, तसेच उत्पादन प्रकल्पावर 100 टक्के मालकी मिळवणे यांचा समावेश आहे. या सर्व पावलांमुळे भारत हा Renault Group च्या व्यवसायासाठी महत्त्वाचा देश असल्याचा स्पष्ट संदेश मिळतो.

याशिवाय, कंपनीने आपल्या प्रमुख मॉडेल्सना 2025 मध्ये अपडेट दिले. जुलैमध्ये नवीन Triber आणि ऑगस्टमध्ये नवीन Kiger लाँच करण्यात आली, ज्यामुळे वर्षाच्या उत्तरार्धात ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विक्री आणि डीलर नेटवर्कच्या सुधारित अंमलबजावणीमुळे Q4 मध्ये मजबूत ‘एग्झिट मोमेंटम’ नोंदवण्यात आला.

दरम्यान, Renault ची आयकॉनिक SUV Duster पुन्हा एकदा भारतीय बाजारात परतणार असून, तिचे लाँचिंग 26 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.

Web Title: Renaut india december 2025 sales increased by 33 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • record sales
  • Renault

संबंधित बातम्या

अरे बाईक आहे की लक्झरी कार? किंमत इतकी जास्त की दारात दोन Fortuner उभ्या राहतील!
1

अरे बाईक आहे की लक्झरी कार? किंमत इतकी जास्त की दारात दोन Fortuner उभ्या राहतील!

तारीख ठरली! Tata Punch Facelift ‘या’ दिवशी लाँच होण्याची जास्त संभावना
2

तारीख ठरली! Tata Punch Facelift ‘या’ दिवशी लाँच होण्याची जास्त संभावना

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?
3

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Kia Seltos आणि Tata Sierra आमने सामने! कोणती कार तुमच्यासाठी एकदम भारी?
4

Kia Seltos आणि Tata Sierra आमने सामने! कोणती कार तुमच्यासाठी एकदम भारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.